देशविरोधी कारवाई करणारे अधिकारी बडतर्फ

By admin | Published: October 20, 2016 11:35 AM2016-10-20T11:35:38+5:302016-10-20T11:39:20+5:30

जम्मू-काश्मीर सरकारने देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत 12 पेक्षा जास्त अधिका-यांना बडतर्फ केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.

Badhartf, an anti-country official | देशविरोधी कारवाई करणारे अधिकारी बडतर्फ

देशविरोधी कारवाई करणारे अधिकारी बडतर्फ

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 20 - जम्मू-काश्मीर सरकारने देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत 12 पेक्षा जास्त अधिका-यांना बडतर्फ केले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या सर्व अधिका-यांचा देशविरोधी कारवायांशी संबंधित असलेला अहवाल मुख्य सचिवांकडे सुपुर्द केला. यानंतर संबंधित विभाग प्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.  बडतर्फ करण्यात आलेल्या अधिका-यांमध्ये काश्मीर विद्यापीठातील सहाय्यक रजिस्ट्रारचाही समावेश आहे. शिवाय, शिक्षण विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग,  अभियांत्रिकी विभाग, अन्नपुरवठा विभागातील अधिका-यांचाही समावेश आहे. 
 
कलम 126 अंतर्गत या सरकारी अधिका-यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.  यातील काही अधिका-यांविरोधात आधीच सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर काही जण अटकेची कारवाई टाळण्यासाठी फरार झाले आहेत, असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले आहे.   
 

Web Title: Badhartf, an anti-country official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.