बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे CEO व माजी पुजा-याविरोधात छेडछाडाची आरोप
By admin | Published: July 1, 2017 03:48 PM2017-07-01T15:48:55+5:302017-07-01T15:55:52+5:30
महाराष्ट्रातील एका महिलेनं बद्रीनाथ मंदिराचे माजी मुख्य पुजारी आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे सीईओवर छेडछाडीचा आरोप केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 1 - महाराष्ट्रातील एका महिलेनं बद्रीनाथ मंदिराचे माजी मुख्य पुजारी आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे सीईओवर छेडछाडीचा आरोप केला आहे. चमोलीच्या पोलीस अधीक्षक तृप्ती भट यांनी पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले की, मुंबईमधील एका साध्वीनं असा आरोप केला आहे की पुजारी विष्णू प्रसाद नंबूगिरी आणि सीईओ बी.डी.शर्मा या दोघांनी बद्रीनाथ येथील प्रख्यात मंदिरात पूजा-अर्चना करण्यासाठी आलेल्या असताना त्यांची छेडछाड केली. ही घटना जून महिन्यातील आहे.
पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. शिवाय, साध्वीनं दोघांवर धमकी देणे यासहीत मुंबईतील त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करणे तसेच गेल्या काही वर्षांमध्ये साध्वींच्या कुटुंबातील पाच सदस्यांचं रहस्यमयरित्या बेपत्ता होण्यातही कथित स्वरुपात या दोघांची भूमिका असल्याचाही आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपांची चौकशी करण्यासंदर्भात एक पथक मुंबईत पाठवण्यात आले आहे. खरंच या दोघांनी साध्वी यांची संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला आहे का?, या दिशेनं तपास सुरू आहे.
दरम्यान, बद्रीनाथच्या पुजा-यावर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. बद्रीनाथ केशव प्रसाद नंबूदिरीचे माजी प्रमुख पुजा-याला फेब्रुवारी 2014 मध्ये अटक करण्यात आले होते.
तेव्हा या पुजा-यावर एका महिलेनं दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मद्यधुंद अवस्थेत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.