बादशाहला देशाबाहेर जाण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावीच लागेल

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:45+5:302015-08-26T23:32:45+5:30

हायकोर्ट : अट रद्द करण्याची विनंती अमान्य

Badshah has to take preliminary approval to go out of the country | बादशाहला देशाबाहेर जाण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावीच लागेल

बादशाहला देशाबाहेर जाण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावीच लागेल

Next
यकोर्ट : अट रद्द करण्याची विनंती अमान्य
नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह याला यापुढेही देश सोडण्यापूर्वी सत्र न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यावीच लागणार आहे. ही अट रद्द करण्याची बादशाहची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अमान्य केली. त्यासोबतच बादशाहला अंशत: दिलासा देताना त्याने देशाबाहेर जाण्याच्या परवानगीसाठी सादर केलेला अर्ज तीन दिवसांत निकाली काढावा, असे निर्देश सत्र न्यायालयाला दिलेत.
याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. हे अर्ज प्रलंबित असून दोघेही तात्पुरत्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करताना दोघांनाही पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही, अशी अट सत्र न्यायालयाने ठेवली आहे. ही अट रद्द करण्यासाठी बादशाहने सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. काही दिवसांपूर्वी हा अर्ज खारीज करण्यात आला. या निर्णयाविरुद्ध बादशाहने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. व्यवसायाचे स्वरूप पाहता वारंवार विदेशात जावे लागते. यामुळे प्रत्येकवेळी परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जावर लवकर निर्णय होत नाही. अशावेळी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, असे बादशाहचे म्हणणे होते. बादशाहतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, तक्रारकर्त्यातर्फे ॲड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली. मनोहर यांना ॲड. रजनीश व्यास व ॲड. अमित कुकडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Badshah has to take preliminary approval to go out of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.