साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:27 PM2023-05-31T12:27:18+5:302023-05-31T12:28:19+5:30

साक्षी हत्याकांडाने राजधानी दिल्ली हादरली असून, यासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

bageshwar baba dhirendra krishna shastri reaction over delhi sakshi murder case | साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

साक्षी हत्याकांडप्रकरणी बागेश्वर बाबांचा तीव्र संताप; म्हणाले, “असा प्रकार पाहून...”

googlenewsNext

Bageshwar Dham Dhirendra Shastri:दिल्लीतील शाहबाद डेअरी भागातील रस्त्यावर साहिल नामक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून निर्घृण हत्या केली होती. या घटनेत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या मुलीचे नाव साक्षी असून, ती अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली आहे.  

ही पूर्वनियोजित हत्या होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी राहत असलेल्या गल्लीत तो थांबला होता. सार्वजनिक शौचालयातून ती बाहेर आल्यावर आरोपी तरुणीसमोर आला. यानंतर त्याने मुलीवर चाकूने अनेक वार केले आणि तिला दगडाने ठेचले. पण तेथून जाणाऱ्या लोकांनीही मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

असा प्रकार पाहून...

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे की, या घटनेने खूप दु:ख झाले आहे. हे पाहून ज्याचे रक्त उकळत नाही तो आधीच मेला आहे, असेच मानावे लागेल. लोक आम्हाला कट्टरवादी म्हणतात. लोक सांगतात की, आम्ही वादग्रस्त बोलतो. जगात असा एकही भाऊ नसेल ज्याचे आपल्या बहिणींची अशी अवस्था पाहून रक्त उसळत नसेल. हे पाहून ज्याचे रक्त उसळत नाही तो आधीच मेला आहे, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आमचा सनातनवर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो की, आमचा सनातन धर्म मारायला शिकवत नाही, तर वाचवायला शिकवतो, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे त्याने म्हटले आहे.

 

Web Title: bageshwar baba dhirendra krishna shastri reaction over delhi sakshi murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.