'ज्ञानवापी ही मशीद नसून शिवमंदिर'; बागेश्वरबाबांचा दावा, नूह हिंसाचारावरही केले वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 04:21 PM2023-08-07T16:21:13+5:302023-08-07T16:21:40+5:30
शनिवारपासून छिंदवाडा येथे बागेश्वर बाबांचा दरबार सुरू करण्यात आला आहे.
बागेश्वर धाम येथील पीठाधीश्वर पंडीत धारेंद्र शास्त्री यांनी ज्ञानवापी मशीद संदर्भात एक मोठा दावा केला आहे. "ज्ञानवापी ही मशीद नसून तिथे भगवान शिव मंदीर आहे", असा दावा बागेश्वर बाबा यांनी केला आहे. दुसरीकडे, नूह हिंसाचारावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सनातन्यांना हे पाहावे लागले हे देशाचे दुर्दैव आहे. बाबा बागेश्वर यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दरबारात ही प्रतिक्रीया दिली.
टोमॅटो दरवाढीचा असाही निषेध; गळ्यात माळ घालून आमदार विधानपरिषदेत
शनिवारपासून मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे बागेश्वर बाबांचा दरबार सुरू करण्यात आला आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, जातीवाद दूर करून सर्वांना एकत्र करायचे आहे. भारतात राहणारे सर्व लोक सनातनी आहेत. बाबांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत.
यावेळी पत्रकारांनी धीरेंद्र शास्त्री यांना विचारले की, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि खासदार नकुलनाथ यांना तुम्ही भक्त म्हणून कसे पाहता? तर यावर बाबा म्हणाले की, धाममध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी समान आहे. जे प्रभू राम आणि आमच्या बालाजीचे आहे, ते आमचेही आहेत. तत्पूर्वी, बाबा बागेश्वर शनिवारी छिंदवाडा येथे पोहोचले तेव्हा खासदार नकुलनाथ आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर बाबा बागेश्वर कमलनाथ यांच्या शिकारपूर येथील निवासस्थानीही गेले, जिथे कमलनाथ यांनी स्वतः बाबांची आरती केली.
छींदवाडा येथे बाबांचा दरबार लावण्यात आला आहे. येथे अनेकांनी हजेरी लावली आहे. येथे भाविकांसाठी मोफत खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यापूर्वी बाबा बागेश्वर यांनी बिहार, गुजरातसह देशातील विविध राज्यांमध्ये आपले दरबार स्थापन केले आहे.