बागेश्वर धाम: ते राम रहीमचे चेले, थोड्या दिवसांनी तुरुंगात असतील; ओपी राजभर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:47 PM2023-01-25T13:47:15+5:302023-01-25T13:47:35+5:30
कोणताही धर्म आपसात वैर शिकवत नाही. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात, जो आरोप करत असेल, तो चुकीचा असेल तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरोधात आरोपांची मालिका सुरु आहे. अनिसने शास्त्रींना आव्हान दिले असून जिंकल्यास ३० लाखांचे बक्षिसही ठेवण्यात आले आहे. यावर आता सुभासपाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी धक्कादायक दावा केला आहे.
धीरेंद्र शास्त्री हे बलात्कारातील आरोपी राम रहीमचे चेले आहेत. आता काही दिवसांनी ते तुरुंगात जातील, असे म्हटले आहे. एकदा ते पक्षाच्या नेत्याला भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते. तेव्हा पंचवीसहून अधिक बाबा तुरुंगात खितपत पडल्याचे पाहिले आहे. कोणताही धर्म आपसात शत्रुत्वाची शिकवण देत नाही, असा दावा राजभर यांनी केल आहे.
सुभाषपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर मंगळवारी बस्ती येथे आले होते. रामचरितमानसवरील स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वादग्रस्त विधानावर त्यांनी हल्लाबोल केला. चारवेळा बसपा सरकार सत्तेत होते, तेव्हा त्यांना आठवले नाही की ही हे चुकीचे आहे, ती सुधारायला हवी होती. आता बसपाचे सरकार गेल्यावर स्वामी प्रसाद मौर्य रामाच्या आश्रयाला गेले आहेत असा आरोप त्यांनी केला.
रामाचा आश्रय घेऊन त्यांनी आपल्या मुलीला खासदार बनवले, स्वत: मंत्री झाले आणि सलग 5 वर्षे मंत्री राहिले, पण 5 वर्षात त्यांना ही गोष्ट आठवली नाही, मग ते सपामध्ये गेले. सरकार आले नाही आता ते पुन्हा चर्चेत राहण्यासाठी असे बोलत असल्याचेही राजभर म्हणाले.
कोणताही धर्म आपसात वैर शिकवत नाही. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढले जातात, जो आरोप करत असेल, तो चुकीचा असेल तर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. ते चुकीचे करत असतील या लोकांनी न्यायालयात जावे. जितने लोग है, सब राम रहीम के चेला है, काही दिवसांनी राम रहीमप्रमाणे सगळे तुरुंगात असतील, असे त्यांनी बागेश्वर धामवर म्हटले.