'अशा विषयाचे चित्रपट बनवायला ...;'द केरळ स्टोरी' चित्रपटासंदर्भात धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:00 AM2023-05-22T09:00:02+5:302023-05-22T09:01:13+5:30
'द केरळ स्टोरीसारखे आणखी चित्रपट बनले पाहिजेत. आपल्या देशातील हिंदूमध्ये जागृती करण्यासाठी असले चित्रपट बनवणे आवश्यक आहे, असंही पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
'दे केरळ स्टोरी' या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले, जे काही आहे ते चित्रपटात स्पष्टपणे दिसत आहे. आम्ही जे बोलत होतो ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. देशाच्या प्रबोधनासाठी अशा आणखी चित्रपटांची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
धीरेंद्र शास्त्री यांनी केरळहून आलेल्या एका मुलीसोबत या विषया संदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 'त्या चित्रपटात जे दाखवले आहे तेच सध्या देशात घडत आहे, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले. विचार करून इतर धर्मांवर विश्वास ठेवावा. सनातन धर्मात असेही लिहिले आहे की, सध्या हिंदू झोपलेला आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सध्या हिंदू झोपेत आहे. जे घडत आहे ते केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवले आहे. दुसऱ्या धर्माचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मासाठी मरणे चांगले, जोपर्यंत अशा घटना घडत राहतील, तोपर्यंत असे चित्रपट बनत राहतील. आता हिंदूंनी जागे झाले पाहिजे, हे या चित्रपटातून समजले पाहिजे. महिलांनी यातून धडा घेण्याची गरज आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.