“मला आदेश देण्यात आला की सनातन धर्माचा प्रचार कर”; बागेश्वर बाबांना हे कोणी सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 07:30 PM2023-12-15T19:30:17+5:302023-12-15T19:30:27+5:30

Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: दिव्य शक्ती कोणी दिल्या, याबाबत बागेश्वर बाबा यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

bageshwar dham dhirendra shastri said he get strength from lord hanuman | “मला आदेश देण्यात आला की सनातन धर्माचा प्रचार कर”; बागेश्वर बाबांना हे कोणी सांगितले?

“मला आदेश देण्यात आला की सनातन धर्माचा प्रचार कर”; बागेश्वर बाबांना हे कोणी सांगितले?

Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धाम पीठीचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत असतात. देशातील अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार आयोजित केला जातो. लाखो भाविक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात हजेरी लावतात. यातच आता मला आदेश देण्यात आला, त्याप्रमाणे सनातन धर्माचा प्रचार करतो, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले.

एका मुलाखतीत बोलताना बागेश्वर बाबा म्हणाले की, प्लानिंग करून लोक माझी परीक्षा घेत असतात. परंतु हनुमानजींच्या कृपेने ते सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होतो. अशिक्षित लोक मला पुरावे द्यायला सांगतात. माझे शिक्षण अध्यात्म आणि हनुमानजींच्या कृपेमुळे झाले आहे. आता त्यांच्याकडून कोणतीही प्रमाणपत्रे घेत नाहीत, ज्यांना शंका आणि प्रश्न आहेत, त्यांनी येऊन अनुभव घ्यावा, असे सांगतो, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले.

मला आदेश देण्यात आला की सनातन धर्माचा प्रचार कर

मी जे काही सांगतो, हनुमानजी मला तसे करण्याचा आदेश देतात. त्यांची आज्ञा मोडणे किंवा त्यांना चुकीचे ठरवण्याचा अधिकारात नाही. जे काही करतो, ते सर्व गुरूंच्या कृपेने शक्य होते. त्याच्याकडून मी हे सर्व साध्य केले आहे. त्या शक्तीचे नाव आहे ‘शक्तिपाठ’. पूर्वी आमचे आजोबाही असेच करायचे, पण त्यावेळी त्यांचे क्षेत्र मर्यादित होते, असे बागेश्वर बाबा यांनी सांगितले. गुरूंच्या कृपेने मला सनातन धर्माचा प्रचार करण्याची आज्ञा मिळाली आहे. हे सर्व आपण लोककल्याणासाठी करतो, पण लोक याकडे आपापल्या दृष्टीकोनातून पाहतात, असेही बागेश्वर बाबा म्हणाले.

दरम्यान, गुरुजींनी सांगितलेली हनुमानजींची पूजा मी करतो, मी कोणतीही मोठी तपश्चर्या करत नाही. दोन्ही पद्धती गुप्त आहेत. हा विषय कोणत्याही मंचावर सांगण्याचा नाही. हनुमानजींच्या त्या विधींचे पालन केले. मला एक अनुभूती मिळते आणि या क्षणी समोरच्या व्यक्तीला जे काही प्रश्न असतील ते आम्ही लोकांना सांगतो. यानंतर गुरुदेव आणि हनुमानजींना काय ते पाहून घेतात, अशी माहिती धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिली.


 

Web Title: bageshwar dham dhirendra shastri said he get strength from lord hanuman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.