मशिदींचे संरक्षण करण्याच्या ओवेसींच्या आवाहनावर धीरेंद्र शास्त्रींचा पलटवार, म्हणाले- 'त्यांची भीती कायम राहो'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:50 AM2024-01-05T10:50:22+5:302024-01-05T10:52:38+5:30
एमआयएमआयएम चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम तरुणांना सांगितले की, मशिदीचे संरक्षण करा,यावर आता धीरेंद्र शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसापूर्वी मुस्लिम तरुणांना मशिदींचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. ओवेसींच्या या वक्तव्यावर आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पलटवार केला आहे. यावरून ओवेसी यांची भीती दिसून येते आणि त्यांची भीती कायम राहो, असा देव त्यांना आशीर्वाद देतो, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.
INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'त्यांच्यामध्ये असलेली ही भीती ते किती कमकुवत आणि किती क्रूर आहेत हे दाखवत आहे. मशिदी पाडून मंदिरे बांधायची असती तर मशिदींऐवजी पुरोहितांनीच मंदिरे बांधली असती. 'आम्हाला मशिदींवर मंदिरे बांधायची नाही, जिथे मंदिरे होती तिथे पुन्हा मंदिरे बांधायची आहेत. आता त्यांच्या मनात ही भीती असेल, तर त्यांची भीती कायम राहते, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
काही दिवसापूर्वी जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले, ' तरुणांनो मी तुम्हाला सांगतोय की आम्ही आमच्या मशिदी कशा गमावल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता काय होत आहे. तुमच्या अंतःकरणात दुःख नाही का?' 'ज्या ठिकाणी आपण ५०० वर्षे बसून कुराण पठण केले ते आज आपल्या हातात नाही. तरुणांनो, तीन-चार मशिदींबाबत षडयंत्र सुरू आहे, हे दिसत नाही का?
'दिल्लीच्या गोल्डन मशीदचाही समावेश मशिदींमध्ये आहे ज्याबाबत कट रचला जात आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही हे स्थान मिळवले आहे. तुम्ही लोकांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. ओवेसी यांनी मुस्लिम तरुणांना सतर्क राहण्यास सांगितले. ते म्हणाले मशिदी लोकवस्तीत ठेवा. या मशिदी आमच्याकडून हिसकावून घेतल्या जाण्याचीही शक्यता आहे. एकता ही शक्ती आहे आणि एकता ही दया आहे, असंही ओवेसी म्हणाले.