भयंकर! दाट धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वेवर मोठा अपघात, तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 01:01 PM2021-01-01T13:01:38+5:302021-01-01T13:15:23+5:30
Eastern Peripheral Expressway Accident : वाहन चालकांना धुक्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागतो.
नवी दिल्ली - धुक्यामुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. वाहन चालकांना धुक्यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मोठा अपघात झाला आहे. तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची घटना समोर आली आहे.
बागपतमध्ये धुक्यामुळे हा भयंकर अपघात झाला आहे. तब्बल 18 गाड्या एकमेकांवर धडकल्या. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून एक्स्प्रेस-वे खाली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नववर्षाच्या सुरुवातीला अनेक भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. दिल्लीत तापमानाचा पारा तब्बल 1.1 डिग्री सेल्सिअसवर पोहचला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात सकाळी दाट धुकं पसरलं होतं. तसेच दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी शून्य झाली होती आणि त्यामुळे वाहतूक मंदावलेली पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोना चाचणीच्या रिपोर्टमध्ये गडबड करणारं एक मोठं रॅकेट आलं समोरhttps://t.co/HKGDRqVm9Z#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) January 1, 2021