बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 04:22 AM2024-10-13T04:22:45+5:302024-10-13T04:23:33+5:30
अपघातानंतरचा डेटा-लॉगर व्हिडीओ समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या चेन्नईलगत तिरुवल्लूर जिल्ह्यात म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री एका मालगाडीला धडकली. हा अपघात म्हणजे ओडिशातील बालासोर रेल्वेअपघाताची पुरावृत्ती असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. अपघातानंतरचा डेटा-लॉगर व्हिडीओ समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.
बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जवळपास ३०० प्रवासी ठार, तर एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता. मात्र, ही रेल्वे मुख्य मार्गाऐवजी मालगाडी उभी असलेल्या लूप लाइनवर गेली. डेटा-लॉगर व्हिडीओच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. रेल्वेच्या हालचाली व सिग्नलचे संकेत टिपण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात ठेवलेल्या उपकरणाला डेटा-लॉगर संबोधले जाते.
सरकारला कधी जाग येणार : राहुल
रेल्वे अपघातांबाबत सरकारला कधी जाग येणार, असा सवाल उपस्थित करत विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. रेल्वे अपघातात किती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यानंतर सरकारची डोळे उघडतील, असे ते म्हणाले.