9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 08:01 PM2024-10-06T20:01:14+5:302024-10-06T20:02:03+5:30

गेल्या काही महिन्यांपासून लांडग्यांनी 9 मुले अन् एका महिलेचा जीव घेतला. याशिवाय, 50 हून अधिक लोकांना जखमी केले.

Bahraich wolf attack, last wolf was found dead | 9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला

9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला

Bahraich Wolf Attack :उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अनेक चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत अखेर संपली. टोळीतील शेवटचा लांडगा मृतावस्थेत आढळला. गेल्या अनेक दिवसांपासून या लांडग्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू होते. हा शेवटचा लांडगा मेल्यानंतर ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. आता लांडग्यांच्या दहशतीवर नियंत्रण येईल, अशी ग्रामस्थांना आशा आहे. 

सविस्तर माहिती अशी की, बहराइच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून लांडग्याच्या टोळीने दहशत पसरवली होती. या टोळक्याने आतापर्यंत 9 लहान मुले आणि एका महिलेला आपली शिकार बनवले होते. तसेच, 50 हून अधिक लोकांना जखमी केले. यामुळे ग्रामस्थ मोठ्या दहशतीत जगत होते. वन विभाग गेल्या काही दिवसांपासून या लांडग्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण, लांडगे प्रत्येकवेळी हातावर तुरी देऊन निसटून जायचे.

लांडग्यांची दहशत कधी सुरू झाली?
बहराइचच्या औरही गावातून लांडग्यांची दहशत सुरू झाली. येथे लांडग्यांनी पहिल्यांदा 7-7 वर्षांच्या दोन मुलांवर हल्ला केला. फिरोज नावाच्या मुलावर दोन महिन्यांपूर्वी लांडग्यांनी हल्ला केला होता. तो आईसोबत झोपला असताना रात्री बाराच्या सुमारास एका लांडग्याने घराच्या व्हरांड्यात घुसून त्याचा गळा पकडून ओढत नेले होते. त्याच्या आईने दोन्ही पाय धरुन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण लांडग्याने चिमुकल्याला सुमारे 200 मीटर शेतात ओढले. फिरोजचा जीव वाचला, पण लांडग्याने त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. 

लांडग्याच्या नावाने मुलं थरथर कापतात

अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने एक-एक करत लांडग्यांना पकडणे सुरू केले. 10 सप्टेंबर रोजी महसी येथे पाचवा नरभक्षक लांडगा पकडला गेला होता. पण, शेवटचा लांडगा मोकळा फिरत होता, त्यामुळे ग्रामस्थ अस्वस्थ होते. आता अखेर हा शेवटचा लांडगा मृतावस्थेत आढळल्यामुळे गावकरी चिंता मुक्त झाले आहेत. दरम्यान, गावातील मुलांमध्ये लांडग्यांची इतकी दहशत पसरली आहे की, लांडग्याचे नाव काढले तरी मुले थरथर कापतात.
 

Web Title: Bahraich wolf attack, last wolf was found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.