बाहुबली शहाबुद्दीनचा जामीन रद्द, पुन्हा खावी लागणार तुरूंगाची हवा

By admin | Published: September 30, 2016 01:32 PM2016-09-30T13:32:55+5:302016-09-30T13:32:55+5:30

बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनचा जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला त्यामुळे शहाबुद्दीनला आता पुन्हा

Bahubali Shahabuddin's bail is canceled, the jails need to be eaten again | बाहुबली शहाबुद्दीनचा जामीन रद्द, पुन्हा खावी लागणार तुरूंगाची हवा

बाहुबली शहाबुद्दीनचा जामीन रद्द, पुन्हा खावी लागणार तुरूंगाची हवा

Next
>ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 30 - बिहारचा कुख्यात गुंड आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनचा जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे शहाबुद्दीनला आता पुन्हा तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.  7 सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने शहाबुद्दीनला अॅसिड हल्ल्याप्रकरणी जामीन मंजूर केला होता.
 
काल सर्वोच्च न्यायालयाने शहाबुद्दीनच्या जामिनाबाबत निर्णय राखीव ठेवला होता. जर न्यायालयाने सांगितले तर सिवान किंवा बिहारच्या बाहेर जायला मी तयार आहे. मात्र, माझा जामीन रद्द करू नये अशी विनंती शहाबुद्दीनकडून न्यायालयाला करण्यात आली होती. त्याची विनंती मान्य न करता सर्वोच्च न्यायालयाने आज त्याचा जामीन रद्द केला.
 
मागील अकरा वर्षांपासून शहाबुद्दीन तुरुंगामध्ये कैद होता. शहाबुद्दीनच्या सुटकेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि बिहार सरकार त्याच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. 
 2004 मध्ये चंदाबाबूंच्या दोन मुलांना शहाबुद्दीनने ऍसिड टाकून ठार केले होते. त्यानंतर या घटनेचा साक्षीदार त्यांचा तिसरा मुलगा राजीवचीही दोन वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. राजीवच्या हत्येप्रकरणाचा खटला सुरू झाला नव्हता त्याच आधारावर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. 

Web Title: Bahubali Shahabuddin's bail is canceled, the jails need to be eaten again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.