वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांना कारावासाची शिक्षा पिंपळकोठा येथील लाच प्रकरण : दोन असिस्टंट लाइनमनचा समावेश

By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:08+5:302016-03-29T00:25:08+5:30

जळगाव : शेतातील बंद असलेला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्याच्या मोबदल्यात शेत मालकाकडून १४०० रुपयांची लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली.

Bail of the Electricity Company employees for imprisonment. Bail of Pimpalkota: Two Assistant Lineaiman's Inclusion | वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांना कारावासाची शिक्षा पिंपळकोठा येथील लाच प्रकरण : दोन असिस्टंट लाइनमनचा समावेश

वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांना कारावासाची शिक्षा पिंपळकोठा येथील लाच प्रकरण : दोन असिस्टंट लाइनमनचा समावेश

Next
गाव : शेतातील बंद असलेला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करण्याच्या मोबदल्यात शेत मालकाकडून १४०० रुपयांची लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने वीज वितरण कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांना सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली.
असिस्टंट लाइनमन भगवान धनसिंग पाटील व दगडू अमीर मण्यार अशी शिक्षा झालेल्या दोन्ही कर्मचार्‍यांनी नावे आहेत. एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे ९ ऑक्टोबर २०१४ रोजी या दोघांनी तक्रारदाराच्या शेतातील बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाच स्वीकारली होती. त्या वेळी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्‘ाचा तपास लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश›ंद्र पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर हा खटला न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात चालला.
शिक्षेचे स्वरूप असे
लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भगवान पाटील याला कलम ७ नुसार दोन वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड, कलम १३ (१) (२) नुसार दोन वर्ष शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तर आरोपी दगडू मण्यारला कलम १२ नुसार एक वर्ष शिक्षा व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दीड महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.एस.जी. काबरा यांनी तर आरोपींतर्फे ॲड.आर.के. पाटील यांनी कामकाम पाहिले.

Web Title: Bail of the Electricity Company employees for imprisonment. Bail of Pimpalkota: Two Assistant Lineaiman's Inclusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.