महिला कुस्तीपटू लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 05:06 PM2023-07-20T17:06:30+5:302023-07-20T17:07:22+5:30
कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज दुपारी निकाल राखून ठेवला होता.
गेल्या काही महिन्यांपासून महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच दिल्लीत आंदोलनही केले होते. यानंतर न्यायालयाने बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज दुपारी निकाल राखून ठेवला होता. यावर काहीवेळाने निकाल दिला आहे. यामध्ये ब्रृजभूषण शरण सिंह आणि फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंह यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयाने दोघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांना जामीन देताना काही अटी घातल्या आहेत. आरोपींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तक्रारदार किंवा साक्षीदारांना धमकावू नये. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कागदपत्रांच्या छाननीसाठी पुढील सुनावणीची तारीख 28 जुलै 2023 देण्यात आली आहे.