CoronaVirus News : कोरोना रुग्णांना दिलासा, बजाज हेल्थकेअरकडून 'Favijaj' टॅबलेट लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:49 PM2021-05-06T16:49:03+5:302021-05-06T16:55:24+5:30
Bajaj Healthcare launches 'Favijaj' tablets for treating COVID-19 : बजाज हेल्थकेअरने (Bajaj Healthcare) आपले अँटीपारॅसॅटिक (Antiparasitic) औषध फविजाज (Favijaj) बाजारात आणण्याची घोषणा केली.
नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच, कोरोनामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. यातच एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय औषध निर्माता कंपनी बजाज हेल्थकेअरने (Bajaj Healthcare) आपले अँटीपारॅसॅटिक (Antiparasitic) औषध फविजाज (Favijaj) टॅबलेट बाजारात आणण्याची घोषणा केली. हे औषध कोरोना संसर्गाच्या उपचारात वापरले जाऊ शकते.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठविलेल्या नोटिसमध्ये कंपनीने म्हटले आहे की, या औषधाच्या निर्मिती व विपणनासाठी याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (Drugs Controller General of India)मान्यता मिळाली आहे. बजाज हेल्थकेअरने असे म्हटले आहे की, इव्हेरमॅक्टिनसाठी औषधी घटक आणि त्याचे फॉर्म्युलेशन स्वत: च्या संशोधन आणि विकास कार्यसंघाद्वारे यशस्वीरित्या विकसित केले गेले आहेत. डीसीजीआयने या टॅबलेटला देशांतर्गत आणि परदेशी बाजारात पाठविण्याची परवानगी दिली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
(Paytm वर आता COVID Vaccine slotsची माहिती, मिळणार इंस्टंट अलर्ट)
दरम्यान, जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 15 कोटींच्या वर गेली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे.
11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद
बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही आठवड्यात ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या ही सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट असू शकते असे रिसर्चमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास रुग्णांची आणि मृतांची संख्या ही आणखी वाढू शकते. कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.