PK दाखवणा-या दोन सिनेमागृहांवर अहमदाबादमध्ये बजरंग दलाचा हल्ला

By admin | Published: December 29, 2014 04:07 PM2014-12-29T16:07:19+5:302014-12-29T16:07:19+5:30

आमिर खानच्या पीके या चित्रपटाविरोधात भारतातल्या विविध शहरांमध्ये निषेध व्यक्त होत असताना अहमदाबादमध्ये बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तोडफोड

Bajrang Dal attacked in two cinema-making pickets in Ahmedabad | PK दाखवणा-या दोन सिनेमागृहांवर अहमदाबादमध्ये बजरंग दलाचा हल्ला

PK दाखवणा-या दोन सिनेमागृहांवर अहमदाबादमध्ये बजरंग दलाचा हल्ला

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २९ - हिंदूच्या देवतांचा अवमान करणारी दृष्ये असल्याचा आरोप करत आमिर खानच्या पीके या चित्रपटाविरोधात भारतातल्या विविध शहरांमध्ये निषेध व्यक्त होत असताना अहमदाबादमध्ये बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत. शहरातल्या चित्रपटगृहांवर हल्ले करण्यात आल्याचे कॅमे-यांमध्येही टिपण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले आहे. याचप्रकारची निदर्शने भोपाळमध्येही झाली असून सोसल मीडियावरही या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी दृष्ये असल्याच्या पोस्ट फिरत आहेत.
अहमदाबादमधल्या बजरगं दलाचे प्रमुख ज्वलित मेहता यांच्या नेतृत्वाखाली सिटी गोल्ड व शिव थिएटर्स या चित्रपटगृहांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्यांनी तिकिट खिडक्यांवर दगडफेक केली तसेच चित्रपटाची पोस्टर्स फाडली. पोलीसांनी घ़नास्थळी तातडीने धाव घेतली परंतु, तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.
सोमवारी सकाळी १०च्या सुमारास हा प्रकार घडला असून सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे ही नासधूस करणा-यांची ओळख पटवण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. अर्थात बजरंग दलाने या हल्ल्यांची जबाबदारी घेतली असून मेहता यांनी अन्य सिनेमागृहांनीदेखील हा चित्रपट दाखवणे बंद करावे असा फतवा काढला आहे. आमिर खानचा हेतू स्वच्छ असेल तर त्याने त्याच्या धर्माबद्दल म्हणजे इस्लामबद्दल काहीच का दाखवले नाही असा सवाल मेहता यांनी केला असून हिंदूंच्या देवतांबद्दल आक्षेपार्ह दृष्ये पीकेमध्ये दाखवली असल्याचा आरोप केला आहे.
अनुष्का शर्मा या भारतीय मुलीचे सुशांत सिंग राठोड या पाकिस्तानी मुलाशी असलेले प्रेमसंबंधही लव्हजिहादचा प्रसार करतात असा आक्षेप बजरंग दलाने घेतला आहे. पीकेने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत गेला आहे.
माझा चित्रपट स्वत:च काय ते बोलतो, बाकी अशा आरोपांबाबत व निदर्शनांबाबत मी काय बोलणार अशी प्रतिक्रिया आमिरने दिली आहे.

Web Title: Bajrang Dal attacked in two cinema-making pickets in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.