"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत", आंदोलकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 05:46 PM2023-05-04T17:46:10+5:302023-05-04T17:46:17+5:30

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

Bajrang Punia and Vinesh Phogat said that the agitation will continue till the arrest of the president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh and that the Delhi Police is working on behalf of Singh  | "अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत", आंदोलकांचा आरोप

"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत", आंदोलकांचा आरोप

googlenewsNext

brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. आज आंदोलनाचा बारावा दिवस असून विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. रात्री उशीरा दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यात महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ केल्याचा आरोपही या खेळाडूंनी केला आहे. 

आज पैलवानांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. विनेश फोगाटने म्हटले, "सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत जे काही केले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आज सर्वोच्च न्यायालयात आमची सुनावणी पार पडली, न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करू. न्यायालयाने म्हटले आहे की, आमच्यापुढे दिल्ली उच्च न्यायालयासह इतर मार्ग आहेत, जिथे आम्ही जाऊ शकतो. दिल्ली पोलीस ब्रिजभूषणच्या बाजूने काम करत आहेत."

"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच" 
तसेच आम्ही गुन्हेगार नसून आमच्या हक्कासाठी लढायला बसलो आहोत. आमच्या समर्थनार्थ येथे आलेल्या अनेकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे आणि त्या लोकांना काही झाले तर त्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांची असेल. कारवाई होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले. 

आंदोलनाचा आज बारावा दिवस  
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज गुरूवारी आंदोलनाला बारा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Bajrang Punia and Vinesh Phogat said that the agitation will continue till the arrest of the president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh and that the Delhi Police is working on behalf of Singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.