"छेडछाड करणारा मोकाट फिरतोय ही लाजिरवाणी गोष्ट", आंदोलक पैलवानांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 05:25 PM2023-05-03T17:25:13+5:302023-05-03T17:25:34+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brij Bhushan Singh । नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवानांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. आज आंदोलनाचा अकरावा दिवस असून विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवत आहेत. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध कुस्तीपटू मागील अकरा दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर बजरंग पुनियाने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
दिल्ली यूनिवर्सिटी की छात्राओं ने आंदोलित महिला पहलवानों के समर्थन में एक मार्च निकाला था। उनको पुलिस ने हिरासत में ले लिया है।
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 3, 2023
उत्पीड़क खुला घूम रहा है, लेकिन पुलिस उसको पकड़ने की बजाय उन लोगों को पकड़ रही है जो महिला पहलवानों के समर्थन में आ रहे हैं।
यह बहुत शर्मनाक है। pic.twitter.com/2rJecDPyjl
"आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छेडछाड करणारा मोकाट फिरत आहे, मात्र त्याला पकडण्याऐवजी महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ येणाऱ्या लोकांना पोलीस पकडत आहेत. हे खूप लाजिरवाणे आहे", असे बजरंग पुनियाने म्हटले.
आंदोलक संतप्त
लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज बुधवारी आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. खरं तर ब्रिजभूषण यांनी केलेल्या दाव्यानुसार आता केवळ तीन पैलवान आंदोलनस्थळी आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"