भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:30 AM2023-05-24T11:30:25+5:302023-05-24T11:31:16+5:30

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

bajrang yadav from up cracks upsc becomes topper air 454 ias success story | भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या बजरंग यादवची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. बजरंगने देशातील नागरी सेवा परीक्षेत 454 वा रँक मिळवला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

आज तकशी संवाद साधताना बजरंगने सांगितले की, 'माझे वडील राजेश यादव हे व्यवसायाने शेतकरी होते. ते गावातील शेतीसोबतच गरीब, असहाय्य लोकांना मदत करत असत. माझ्या वडिलांचे हे काम काही लोकांना आवडलं नाही आणि त्यांनी 2020 मध्ये माझ्या वडिलांची कट रचून हत्या करण्यात आली. या घटनेने मला हादरवून सोडलं, त्यानंतर मी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. मेहनतीचे फळ मिळाले आणि देशभरातून यूपीएससी परीक्षेत 454 वा रँक मिळाला.

बजरंगला ४ भाऊ आणि एक बहीण आहे, ज्यामध्ये अंबिका यादव घरातील कामे पाहते.  बजरंगच्या या यशावर आजी रेश्मा देवी, काका दिनेश यादव, काका उमेश यादव, काकू सुमनदेवी, मंजू देवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. बजरंगचे प्राथमिक शिक्षण गावातूनच झाले. दहावीची परीक्षा लिटल फ्लॉवर स्कूल कलवारी येथे तर इंटरमिजिएटची परीक्षा उर्मिला एज्युकेशनल अकॅडमी बस्ती येथे झाली. 

2019 मध्ये, त्याने अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc Maths केले आणि दिल्लीत UPSC ची तयारी करत होता. बजरंगच्या या यशानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बजरंग म्हणाला की, "गरिबांची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. माझ्या वडिलांसोबत घडलेल्या घटनेत मला असे दिसून आले की, गरीब आणि असहाय्य लोकांना मोठा अधिकारीच मदत करू शकतो. प्रत्येकजण एक समस्या सोडवण्यासाठी आयएएस होऊ शकत नाही, परंतु एखादी व्यक्ती आयएएस होऊन अनेक प्रश्न सोडवू शकते." 

Web Title: bajrang yadav from up cracks upsc becomes topper air 454 ias success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.