बलसंवर्धन शेजाऱ्याविरुद्ध नाही!

By Admin | Published: October 10, 2016 04:42 AM2016-10-10T04:42:06+5:302016-10-10T04:42:06+5:30

आजच्या स्पर्धात्मक काळात देश सक्षम आणि बलशाली असायला हवा व त्यासाठी सैन्यदले प्रबळ असणे गरजेचे आहे. परंतु आमच्या या बलसंवर्धनाने आमच्या शेजाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही

Balancing is not a neighbor! | बलसंवर्धन शेजाऱ्याविरुद्ध नाही!

बलसंवर्धन शेजाऱ्याविरुद्ध नाही!

googlenewsNext

नवी दिल्ली: आजच्या स्पर्धात्मक काळात देश सक्षम आणि बलशाली असायला हवा व त्यासाठी सैन्यदले प्रबळ असणे गरजेचे आहे. परंतु आमच्या या बलसंवर्धनाने आमच्या शेजाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सूचक भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले.
पूर्वीच्या भारतीय जनसंघाचे अध्यक्ष दिन दयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे जीवन आणि शिकवण याविषयीच्या एकूण १५ पुस्तकांच्या संचाच्या येथील विज्ञान भवनात झालेल्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान बोलत होते.
वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या दसरा सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना मोदी सूचकतेने म्हणाले की, यंदाची विजयादशमी देशासाठी खास महत्वाची आहे. त्यांच्या या भाष्याला भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’चा संदर्भ असल्याने उपस्थितांनी टाळ््यांच्या गजरात त्यास दाद दिली.
बलशाली देशासाठी अत्यंत प्रबळ सैन्यदलांची गरज असणे हा विचार, ही पं. दीन दयला उपाध्याय यांच्या तत्वज्ञानाची देशाला
सर्वात मोठी देणगी आहे, असे
सांगून मोदी म्हणाले की, देशाची सैन्यदले अत्यंत प्रबळ असतील तरच देश बलवान होऊ शकतो, असे पंडितजी म्हणायचे. आजच्या स्पर्धात्मक काळात देश सक्षम आणि बलवान असणे नितांत गरजेचे आहे, हे अगदी खरे आहे.
याच अनुषंगाने पाकिस्तानचा नामोल्लेख न करता पंतप्रधान मिश्किलपणे असेही म्हणाले की, बलवान असणे याचा अर्थ ती
ताकद कोणाच्या तरी विरुद्ध वापरण्यासाठी आहे, असा नाही. आम्ही बलसंवर्धन करीत असलो तर ते आपल्याविरुद्ध आहे असे मानून आमच्या शेजाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. माझे बलसंवर्धन माझे बळ वाढविण्यास व तंदुरुस्तीसाठी आहे! (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘विपक्ष’ ते सक्षम ‘विकल्प’-
पंडितजींच्या विचारसरणीचे अनुसरण केल्याने आधीचा जनसंघ व आताचा भाजपा हा केवळ ‘विपक्ष’ न राहता तुलनेने अल्पावधीत सत्तेसाठी काँग्रेसला प्रबळ ‘विकल्प’ म्हणून उभा राहू शकला, असे पंतप्रधान म्हणाले.
मुठभर नेत्यांकडून चालविली जाणारी नव्हे तर संघटनेवर आधारलेला राजकीय पक्ष हे पं. उपाध्याय यांचे योगदान आहे. जनसंघ आणि भाजपाची तिच ओळख आणि वेगळेपण आहे, असेही मोदी म्हणाले.
बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांची पाक, चीनविरोधी निदर्शने
नवी दिल्ली : चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचे (सीपीईसी) निमित्त करून चीन बलुचिस्तानात घुसखोरी करीत असल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये बलूच कार्यकर्त्यांनी रविवारी निदर्शने केली. ही निदर्शने फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटने (एफबीएम) आयोजित केली होती. सीपीईसीच्या नावाखाली बलुचिस्तानातील नैसर्गिक साधनसंपत्तीची पाकिस्तान आणि चीनकडून होत असलेली लूट आणि बलुचिस्तानातील मानवी हक्कांचे पाकिस्तानकडून होत असलेले शोषण जगासमोर आणण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली, असे एका निदर्शकाने सांगितले.
पाकिस्तान व भारताला युद्ध हा पर्याय नाही-
च्वॉशिंग्टन : पाकिस्तान आणि भारत यांच्यासाठी युद्ध हा पर्याय नाही, असे आग्रही मत अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत जलील अब्बास जिलानी यांनी व्यक्त केले.
च्काश्मीरसह अन्य द्विपक्षीय प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडविण्याची गरज असल्याचे पाकिस्तानला वाटते, असे जिलानी येथे वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.
च्दोन्ही देशांना आर्थिक विकासाची गरज आहे व लोकांच्या कल्याणासाठी त्यांना काम करायचे आहे त्यामुळे युद्ध हा पर्याय नाही, असे ते म्हणाले.
राहील शरीफ यांची
हाजी पीर आघाडीला भेट
इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी नियंत्रण रेषेवरील हाजी पीर भागातील आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांची रविवारी भेट घेतली. शरीफ यांना या तुकडीच्या तयारीची माहिती स्थानिक कमांडरने दिली. शरीफ यांनी सैनिकांचे उच्च मनोधैर्य, कामगिरीची सज्जता व नियंत्रण रेषेवरील सावधगिरीचे कौतूक केले.
ब्रह्मपुत्रेची उपनदी अडविणे योग्यच : चीन-
च्बीजिंग : ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळणारी उपनदी अडवून धरण बांधण्याच्या आपल्या निर्णयाचे चीनने समर्थन केले आहे. या धरणामुळे भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या ओघावर विपरीत परिणाम होईल ही भारताची भीती अनाठायी असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
च्लालहो नावाचे धरण शियाबुकु या उपनदीवर बांधण्यात येणार आहे. स्थानिक भाषेत तिला यार्लुंग झांगबो, असेही म्हणतात. ही उपनदी तिबेटमधील अन्न आणि पूर सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असून ती पूर्णपणे चीनच्या बाजुने असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने या धरणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर चीनने हा दावा केला.

Web Title: Balancing is not a neighbor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.