बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 02:33 PM2023-06-04T14:33:35+5:302023-06-04T14:34:10+5:30

ओडिशा सरकारने तीन वेबसाईटवर देखील हे मृतदेहांचे फोटो अपलोड केले आहेत. हे मृतदेह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण होणार आहे. 

Balasore coromandal Express train accident: 200 bodies still not identified, relatives search through photos... | बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत...

बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत...

googlenewsNext

बालासोर ट्रेन अपघाताबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी ४० तास उलटले तरी अद्याप २०० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाहीय. आपल्या नातलगाचा फोटोतून शोध घेण्याचे आव्हान या प्रवाशांच्या नातेवाईकांसमोर आहे. 

ओडिशा सरकारने याची माहिती दिली आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ओडिशा सरकारने आणि रेल्वे खात्याने मृतदेहांचे फोटो काढून ते एका टेबलवर ठेवले आहेत. ते पाहून नातेवाईक आपल्या आप्तेष्टाचा शोध घेत आहेत. हे नातेवाईक त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार ओडिशाला पोहोचत आहेत. ओडिशा सरकारने तीन वेबसाईटवर देखील हे मृतदेहांचे फोटो अपलोड केले आहेत. हे मृतदेह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण होणार आहे. 

रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली. अपघाताच्या वेळी सर्व सिग्नल ग्रीन होते. गाड्या त्यांच्या ठरलेल्या वेगाने धावत होत्या. कोरोमंडल 128 स्पीडने धावत होती आणि हावडा एक्सप्रेस 126 स्पीडने धावत होती, याचा अर्थ ओव्हरस्पीड नव्हता. हा अपघात कोरोमंडल एक्स्प्रेसलाच झाला असून तिचे नुकसान झाले आहे. ही LHB ट्रेन आहे जी अतिशय सुरक्षित ट्रेन आहे, जरी तिचे डबे घसरले किंवा उलटले तरी प्रवाशांना मोठ्या दुखापती होणार नाहीत. परंतू, इथे हा प्रकार वेगळा होता. ही ट्रेन मालगाडीवर आदळली आणि परिस्थिती बदलली, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. 

मालगाडीला मालगाडीची धडक बसली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. यशवंतपूर एक्स्प्रेस जवळपास सुटली होती की तिचे शेवटचे दोन डबेही या ट्रेनच्या धडकेत आले, त्यामुळे लोक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला, असे रेल्वेने म्हटले आहे. 

Web Title: Balasore coromandal Express train accident: 200 bodies still not identified, relatives search through photos...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.