Odisha Train Accident: ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:20 IST2023-06-09T16:19:18+5:302023-06-09T16:20:21+5:30
बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तर ११०० जण जखमी आहेत.

Odisha Train Accident: ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत
ओडिशा येथील बालासोर येथे तिहेरी रेल्वेअपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृ्तयू झाला, तर ११०० जण जखमी आहेत. या अपघातातील मृतदेह बोलासोर येथील शाळेच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले होते, आता या संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. ज्या इमारतीमध्ये हे मृतदेह ठेवले त्यामध्ये जाण्यास विद्यार्थी आणि शिक्षक घाबरत असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे ही इमारत पाडल आहे.
बहनगा नोडल हायस्कूलचे तात्पुरते शवागार करण्यात आल्याने मुले व शिक्षकांनी गोंधळ घातला. त्यांनी शाळेत प्रवेश नाकारला. त्यांच्या या निर्णयामुळे शाळा पाडून नवीन इमारत बांधण्याचा विचार करण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकत शुक्रवारी ही शाळा पाडण्यात आली आहे.
शाळेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य राजग्राम महापात्रा यांनी सांगितले की, ज्या खोल्यांमध्ये मृतदेह ठेवण्यात आले होते त्या खोल्यांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली होती, मात्र असे असूनही मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. अशा स्थितीत आता शाळा पाडली जात आहे. नवीन इमारत तयार झाल्यानंतर मुले न घाबरता शाळेत यावेत यासाठी पुजारी बोलावून ती जागा पवित्र करण्यात येणार आहे.
राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...
ही शाळा रेल्वे अपघाताच्या ठिकाणापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळा बंद होती. २ जून रोजी झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर बचाव कार्यादरम्यान रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही जागा आवश्यक होत्या. अशा परिस्थितीत बहनगा नोडल हायस्कूलचा यासाठी वापर करण्यात आला.
सुटी संपल्यानंतर १६ जूनपासून शाळा पुन्हा सुरू होणार होती, मात्र मुले व शिक्षकांनी शाळेत येण्यास नकार दिला. मृतदेह येथेच ठेवल्याने ते होरपळले. मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेत २५० मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यासाठी ६ वर्ग खोल्या आणि एका हॉलचा वापर करण्यात आला. नंतर मृतदेह येथून बालासोर आणि भुवनेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर शाळाही पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली, मात्र असे असतानाही मुले आणि शिक्षक शाळेत जाण्यास घाबरत होते.