Video - छपरामध्ये ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी; अचानक छत कोसळलं, १०० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:37 IST2024-09-04T15:21:59+5:302024-09-04T15:37:52+5:30
शेकडो लोक ऑर्केस्ट्रा पाहत असताना अचानक छत कोसळलं. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Video - छपरामध्ये ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी; अचानक छत कोसळलं, १०० जण जखमी
बिहारमधील महावीर जत्रेत मोठी दुर्घटना घडली आहे. शेकडो लोक येथे ऑर्केस्ट्रा पाहत असताना अचानक छत कोसळलं. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
छपराच्या इसुआपूरमध्ये रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होत होता. याच दरम्यान, एका छतावर आणि त्याच्या खाली शंभरहून जास्त लोक उभे होते. अचानक छत कोसळल्याने अनेक जण जखमी झाले. यानंतर उपस्थित असलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
बिहार के छपरा में महावीर मेले के दौरान छज्जे टूटने से करीब 100 लोग घायल हो गए। यह लोग छज्जे पर खड़े होकर आर्केष्टा देख रहे थे। हादसे के बाद भगदड़ से भी कई लोग जख्मी हुए हैं। pic.twitter.com/zTnjWZn1jP
— sonelal.kushwaha (@KushwahaK45286) September 4, 2024
छतावर उभं राहून शेकडो लोक ऑर्केस्ट्राचा आनंद घेत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. जखमींवर इसुआपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. येथे दरवर्षी भव्य मिरवणूक काढण्यात येते.
छत कोसळण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांना माहिती मिळताच दोन पोलीस ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले आणि लोकांना मदत करून त्यांना रुग्णालयात नेलं. त्यापैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.