धक्कादायक! पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या; योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:51 AM2020-10-16T10:51:45+5:302020-10-16T10:58:20+5:30

Uttar Pradesh Crime And Yogi Adityanath :बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

balia murder case cm yogi suspended sdm co and other police officers | धक्कादायक! पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या; योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश

धक्कादायक! पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या; योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश

Next

बलिया - उत्तर प्रदेशच्या  (Uttar Pradesh) बलियामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच भाजपाच्या कार्यकर्त्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून योगी सरकार अ‍ॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिल्याची माहिती मिळत आहे.

एक बैठक सुरू असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबायांनी आरोपी फरार झाल्याने त्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच पोलीस फरार झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याचा शोध घेत आहेत. धिरेंद्र सिंह असं आरोपीचं नाव असून तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे. 

पोलिसांसमोर भाजपा कार्यकर्त्याने केली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. धिरेंद्र सिंह भाजपा आमदाराचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरू झाली. सोशल मीडियावर घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

योगी सरकारने घेतली अ‍ॅक्शन, दिला 'हा' आदेश

मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर काही जणांविरोधात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. तसेच अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: balia murder case cm yogi suspended sdm co and other police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.