जनतेची ओळख नसलेल्या व्यक्तीला तेरा दिवसांत आमदार केले बाळराजे पाटील : येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा असेल

By Admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:21+5:302015-10-03T00:20:21+5:30

सोलापूर :

Balraj Patil: NCP will be the flag in the upcoming Gram Panchayat elections. | जनतेची ओळख नसलेल्या व्यक्तीला तेरा दिवसांत आमदार केले बाळराजे पाटील : येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा असेल

जनतेची ओळख नसलेल्या व्यक्तीला तेरा दिवसांत आमदार केले बाळराजे पाटील : येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच झेंडा असेल

googlenewsNext
लापूर :
ज्याला तालुक्याची ओळखसुद्धा नाही अशा माणसाला माजी आमदार राजन पाटील व मनोहर डोंगरे यांनी अवघ्या 13 दिवसांत आमदार केले. तीच व्यक्ती मोहोळ तालुक्यातील मालकशाही व भाऊगिरी संपवण्याची भाषा करीत आहे. त्याला भविष्यात जनता मुळासह उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्यापासून त्यांच्या तिसर्‍या पिढीपर्यंत अनगरच्या पाटील परिवाराने मोहोळ तालुक्यातील जनतेशी बांधीलकी जपली आहे. तालुकाच आपले कुटुंब समजून केलेल्या कार्यामुळे जनता माजी आमदार राजन पाटील यांना आदराने मालक म्हणते. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून उभारी देताना अनेक कुटुंबे उभी केली. कार्यकर्त्यांची किंमत पैशात मोजणार्‍यांना निष्ठेची किंमत काय कळणार, असा टोला आमदार रमेश कदम यांना लगावत बाळराजे पाटील म्हणाले की, येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मालकगिरी संपवण्याच्या वल्गना करणार्‍यांना जनता आपला हिसका दाखवेल. माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यात 15 वर्षे आमदार म्हणून काम केले. गावागावात, वाड्यावस्त्यावर निष्ठावंत कार्यकर्ते जोडले. कार्यकर्त्यांच्या अडचणीला धाऊन जात त्यांच्यासोबत कौटुंबिक संबंध निर्माण केले.
निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आरक्षित मतदारसंघ असतानाही रमेश कदम यांना विधानसभेत पाठविले. ज्या व्यक्तीचे तालुक्यातील जनतेने कधीही तोंड पाहिले नाही अशा व्यक्तीला आमदार केले. मात्र निवडून आल्यानंतर मालकशाही आणि भाऊगिरी संपविण्याच्या गोष्टी करून कृतघ्नतेचा कळस केला. येणार्‍या ग्रामपंचायतीवरही आमचाच झेंडा राहणार आहे असेही यावेळी बाळराजे पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष विक्रांत दळवी, मोहोळ तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, विधानसभा अध्यक्ष शामराव पाटील, युवक अध्यक्ष विधानसभा शशिकांत पाटील, भारत सुतकर, अभिजित गायकवाड, शहाजहान शेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चौकट..
पैशाच्या जोरावर राजकारण..
गैर मार्गाने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर जर कुणी कार्यकर्ते विकत घेऊन राजकारणावर वर्चस्व वाढविण्याची इच्छा व्यक्त करीत असेल तर ती कधीही पूर्ण होणार नाही. एखाद दुसरा अपवाद वगळता आजवरच्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

Web Title: Balraj Patil: NCP will be the flag in the upcoming Gram Panchayat elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.