गोहत्त्या बंदी, तुरुंगातील संतांचा जामीन व्हावा, अन्यथा दिल्लीत आंदोेलन

By admin | Published: August 31, 2015 09:30 PM2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30

राष्ट्रजागृती हिंदू सभेत रामबालकदास यांचा शासनाला अल्टीमेटम

Ban on bequests, bail out the prisoners in jail, otherwise, Andolon in Delhi | गोहत्त्या बंदी, तुरुंगातील संतांचा जामीन व्हावा, अन्यथा दिल्लीत आंदोेलन

गोहत्त्या बंदी, तुरुंगातील संतांचा जामीन व्हावा, अन्यथा दिल्लीत आंदोेलन

Next
ष्ट्रजागृती हिंदू सभेत रामबालकदास यांचा शासनाला अल्टीमेटम
नाशिक : गोहत्त्या बंदी कायदा राज्यात लागू झालेला असतानाही कत्तलखाने बंद झालेले नाहीत. कायदा केल्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानत तुरुंगात असलेल्या साधू-महंतांच्या जामिनासह गोहत्त्या बंदी कायदा ७ नोव्हेंबरपर्यंत देशभर लागू व्हावा, अन्यथा दिल्लीत आंदोलन करण्याचा अल्टीमेटम राज्यासह केंद्र सरकारला छत्तीसगड मंडळाचे महंत रामबालकदास महात्यागी यांनी दिला. हिंदू सभेच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
महाराष्ट्रात गोहत्त्या बंदीचा कायदा करण्यात आला. मात्र राज्यात कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत. नुसतेच सत्संग, प्रवचन करून चालणार नाही, तर त्यासाठी संत स्वतंत्र लढा देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. गो भक्तांनी एकजूट होण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकार गोहत्त्या बंदी कायदा रद्द करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत आहे. राज्यात देवनार, औरंगाबाद येथील कत्तलखाने त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
गोरक्षासंदर्भात प्रवचन करून आणि धारदार भाषण करून होत नाही. त्यासाठी गायीच्या दुधाशिवाय इतर दुधाचा उपयोग न करण्याचा आपण संकल्प करावा. धर्म, संस्कृतीसाठी साधूंचे विद्यालय आता फक्त कागदावरच राहिले आहेत. पूर्वी या विद्यालयांना खूप महत्त्व होते. त्यात धर्म शिक्षा देण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले जात होते. मात्र सध्या ते दुरापास्त झाल्याचे इंद्रदेव महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

इन्फो:
ओवेसी कुछभी बोलता हैं
ओवेसी हैदराबाद में कुछभी बोलता है, उनपर प्रतिबंध लगवाना चाहीए, हिंदू धर्म का अपमान सहन नही करेंगे, हिंदू संस्कृती का पुरा विश्व सम्मान करता है, इसलिए धर्म के खिलाफ कोई कुछ कहे तो हम उसका जबाब देंगे, अशा शब्दात महंत रामबालकदास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पाकिस्तानमें बनाएंगे राममंदिर
अयोध्या में राममंदिर बनेगाही, उसके साथ पाकिस्तान के इस्लामाबादमें राममंदिर बनाएंगे, हम घरवापसी कर रहे हैं, हम धर्म पर आ जाए तो पाकिस्तान, अफगणिस्तानमें सब हिंदूही दिखेंगे, अशा शब्दात सभेत साध्वी सरस्वती यांनी वक्तव्य केले.

Web Title: Ban on bequests, bail out the prisoners in jail, otherwise, Andolon in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.