India China FaceOff: चीनच्या न्यूज अॅपवर बंदी आणा; इंडियन न्यूज पेपर सोसायटीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:42 AM2020-07-03T00:42:15+5:302020-07-03T00:42:48+5:30
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी
नवी दिल्ली : भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाइट यांचा संपर्क चीनने रोखल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात भारताने चीनची गुंतवणूक असलेले सर्व न्यूज अॅप आणि अन्य प्लॅटफार्म यांच्यावर प्रतिबंध आणावेत, अशी मागणी देशातील प्रिंट आणि डिजिटल न्यूज प्रकाशकांनी केली आहे.
इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्ष शैैलेश गुप्ता यांनी सांगितले की, चीनच्या सरकारने तांत्रिकदृष्ट्या प्रतिबंध केल्याने भारतीय वृत्तपत्रे आणि वेबसाइट यांची आता तिथपर्यंत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या (व्हीपीएन) माध्यमातूनही पोहोच राहिलेली नाही.
या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, चीनच्या मीडियाचा भारतातील संपर्क तात्काळ बंद करावा. चीनची स्थानिक मीडियातील भागीदारी आणि गुंतवणूक समाप्त करण्यात यावी. चिनी कंपनीविरुद्धच्या कठोर कारवाईच्या मागणीला डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने (डीएनपीए) पाठिंबा दिला आहे. डीएनपीएचे अध्यक्ष पवन अग्रवाल म्हणाले की, सरकारने ५९ चिनी अॅप ते न्यूज अॅप/प्लॅटफॉर्मवरील प्रतिबंध वाढवायला हवेत. जेणेकरून, त्यांची भारतातील यूजर्सपर्यंत पोहोच राहणार नाही. सेन्सॉर नसलेले वृत्त लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून चीनच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. एलएसीवर भारत आणि चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे.