कळंगुट येथील क्रिकेटर्स रेस्टॉरंटवर बंदी
By admin | Published: December 25, 2015 02:57 AM2015-12-25T02:57:48+5:302015-12-25T02:57:48+5:30
- स्थानिकांच्या तक्रारीमुळे उपजिल्हाधिकार्यांनी दिला आदेश
Next
- ्थानिकांच्या तक्रारीमुळे उपजिल्हाधिकार्यांनी दिला आदेश म्हापसा : नायकावाडो-कळंगुट येथील क्रिकेटर्स बार अँण्ड रेस्टॉरंट फेब्रुवारी 2016 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर यांनी गुरुवारी दिले आहेत. पर्वरी पोलीस स्थानकाच्या उपअधीक्षकांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांना सादर केलेल्या अहवालाच्या आधारावर हे आदेश देण्यात आले. बुधवारी रात्री कांदोळी व कळंगुट भागातील सुमारे 50 जणांच्या जमावाने या रेस्टॉरंटमुळे स्थानिकांना त्रास होत असल्याची तक्रार करून ते बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये घुसून आतील साहित्याची मोडतोडही केली होती. रेस्टॉरंटमध्ये गैरप्रकार घडत असून परवाना नसताना ते चालवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणानंतर त्या भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर उपअधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून उपजिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या अहवालात, कळंगुट पंचायतीने ते रेस्टॉरंट परत सुरू करण्यास जोरदार हरकत घेतल्याचे म्हटले होते. तसेच कळंगुट पंचायतीने त्याला दिलेला परवाना रद्द करून सुद्धा ते परत सुरु करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. हे रेस्टॉरंट परत सुरू करताना त्याचे चॅम्पियन बार अँण्ड रेस्टॉरंट असे नामकरण करण्यात आले होते. या रेस्टॉरंटच्या मालकाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने त्याच्या विरोधात काही तक्रारींही नोंद झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट पुन्हा सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता उपअधीक्षकांनी व्यक्त केली होती. उपअधीक्षकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे तसेच आमदार मायकल लोबो यांनी केलेल्या विनंतीनुसार हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश उपजिल्हाधिकार्यांनी दिले. देण्यात आलेला आदेश दि. 24 डिसेंबरपासून लागू करण्यात आला असून 20 फेब्रुवारीपर्यंत तो लागू राहणार आहे. (खास प्रतिनिधी)