नागालँडमध्ये लवकरच कुत्र्याच्या मटणावर बंदी
By Admin | Published: July 11, 2016 02:08 PM2016-07-11T14:08:32+5:302016-07-11T14:08:32+5:30
नागालँडमध्ये लवकरच कुत्र्याचे मांस जेवणात वापरण्यावर बंदी येणार आहे. नागालँड सरकारने बंदी घालण्यासाठी पावले उचलली आहे.
ऑनलाइन लोकमत
कोहीमा, दि. ११ - नागालँडमध्ये लवकरच कुत्र्याचे मांस जेवणात वापरण्यावर बंदी येणार आहे. नागालँड सरकारने बंदी घालण्यासाठी पावले उचलली असून, लवकर यासंबंधी दिशानिर्देश दिले जातील. राज्य मंत्रिमंडळाने यासंबंधी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
पण सहसचिव ओबाग्ला जामीर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिका-यांना मटणासाठी म्हणून कुत्रे पकडणे बंद करण्याचे आदेश द्या असे सांगितले आहे. नागालँडमध्ये कुत्र्याच्या मटणाची विक्री केली जाते तसेच जिवंत कुत्र्यांचा बाजार भरतो हा बाजार बंद करावा अशी विनंती नगरपालिकेच्या खात्याने केली आहे.
नागालँडमध्ये कुत्र्याचे मटण चवीने खाल्ले जाते. एक किलो कुत्र्याच्या मटणाची किंमत ३०० रुपये आहे. नागालँडमध्ये अनेक हॉटेलमध्ये कुत्र्याच मटण मिळते. कुत्र्याचे मटण औषधी गुणधर्म आणि पोषक आहार समजला जातो त्यामुळे इथे मोठया प्रमाणात मागणी आहे