E-Cigarettes Ban : ई-सिगारेटच्या विक्री अन् जाहिरातींवरही बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:38 PM2019-09-18T16:38:01+5:302019-09-18T16:38:11+5:30
E-Cigarettes Ban : ई- सिगारेटच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली: ई- सिगारेटच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. ई- सिगारेटच्या संबंधित उत्पादन तसेच आयात- निर्यात, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरातींवर आता बंदी असणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केले आहे.
धुम्रपानाची समस्या सोडवण्यात ई- सीगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे फॅड वाढले आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ई- सिगारेटच्या संबंधित उत्पादन तसेच आयात- निर्यात, विक्री, वितरण, संग्रहण आणि जाहिरातींवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-सिगारेट बंदी घालण्याच्या अध्यादेशाची मागणी करणाऱ्या मंडळाचे (जीओएम) निर्मला सीतारमण प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आली होती.
ई- सीगारेटच्या निर्मिती व विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णयानंतर आरोग्य आणि कुंटुंब कल्याणचे सचिव प्रीति सूदन यांनी सांगितले की,ई- सीगारेटच्या संबंधीत पहिल्यांदा दोषी म्हणून आढळल्यास त्या व्यक्तीला 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाखाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे एकच व्यक्ती दुसऱ्यांदा दोषी म्हणून आढळल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाखाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे.
Preeti Sudan, Secretary Health and Family Welfare: The punishment proposed is imprisonment up to 1 year or a fine of up to Rs. 1 lakh, or both for the first offence&imprisonment of 3 years or a fine up to Rs. 5 lakhs or both, for subsequent offence. E-hookahs are also included. https://t.co/1eoC7s2gbopic.twitter.com/YZqKow7Td8
— ANI (@ANI) September 18, 2019
ई- सीगारेटमध्ये खऱ्या सिगारेटसारखा धूर येत असल्याने सिगरेटचे व्यसन जडलेल्यांना पर्याय म्हणून ई-सिगारेटचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच 400 पेक्षा जास्त ब्रॅड असून 150 पेक्षा अधिक फ्लेवर्समध्ये या ई- सीगारेटचे उपलब्ध आहे.
Union Minister Nirmala Sitharaman: Reports say that there are some who are probably getting into the habit of e-cigarettes as it seems cool. It is believed that there are more than 400 brands, none of which is manufactured yet in India. And they come in over 150 flavours. https://t.co/1eoC7s2gbo
— ANI (@ANI) September 18, 2019