भाजीविक्रेत्यांना गंगाघाटावर व्यवसायास मनाई पोलिसांचा बंदोबस्त : सानप शिष्टाई अयशस्वी, आयुक्तांनी दिला नकार
By admin | Published: December 25, 2015 11:55 PM2015-12-25T23:55:32+5:302015-12-25T23:57:59+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थलांतरित झालेला गोदाकाठचा म्हणजेच गंगेवरील भाजीबाजार पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले. आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करून या विक्रेत्यांना व्यवसाय करू देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र गंगाघाटावर पाालिकेने कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने व्रिकेत्यांना माघारी परतावे लागले. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थलांतरित झालेला गोदाकाठचा म्हणजेच गंगेवरील भाजीबाजार पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना अपयश आले. आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करून या विक्रेत्यांना व्यवसाय करू देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र गंगाघाटावर पाालिकेने कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने व्रिकेत्यांना माघारी परतावे लागले. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम हे विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.
गंगाघाटावरील भाजीबाजार अत्यंत जुना असून, अनेक विक्रेत्यांची चौथी पिढी व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्यांनी आता गणेशवाडी येथील भाजीमंडईत स्थलांतरित करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. कुंभमेळ्याचे निमित्त करून हे विक्रेते चालू वर्षी स्थलांतरित झाले. मात्र, त्यानंतर महापालिकेने अद्याप त्यांना या जागी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. गेल्या सहा महिन्यांपासून विक्रेत्यांना अन्यत्र व्यवसाय करावा लागत आहे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा व्यवसायासाठी अगतिक असलेल्या विक्रेत्यांना भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी शिष्टाई करण्याचे आश्वासन गुरुवारी दिले आणि शुक्रवारी सकाळपासून येथेच व्यवसाय सुरू करा, असे सांगितले होते. मात्र, पालिकेला हा प्रकार कळाल्यानंतर भल्या सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक तैनात होते. त्यामुळे विक्रेत्यांनी स्थानिक अधिकार्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे दुपारी सुीच्या दिवशी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तडॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेण्यात आली. मात्र, त्यांना गंगाघाटावर व्यवसाय करता येणार नाही, असे आयुक्तडॉ. गेडाम यांनी निक्षून सांगितले. गोदावरी प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी प्रदूषण होऊ देणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे काही झाले तरी येथे व्यवसाय करता येणार नाही, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे विक्रेत्यांचा हिरमोड झाला. आयुक्तांना भेटणार्यांमध्ये राजू भोरे, भीमराव सोनवणे, शांतराम क्षीरसागर, अनंत येवले, दिलीप नेरकर यांचा समावेश होता.
फोटो आहेत.
..इन्फो..
आयुक्तांनी सुचवले उपाय
भाजीविक्रेत्यांसाठी गणेशवाडी येथील नवी मंडई हा पर्याय असल्याचे आयुक्तांनी सांगितले, तर गणेशवाडीजवळील एक पाच एकराचा भूखंड विक्रेत्यांनी देण्याची मागणी केली, त्यावर आयुक्तांनी विभागीय अधिकार्यांना पाहणी करून त्या जागेसंबंधी अहवाल देण्याचे सूचित केले.