दहशतवादविरोधी मोहीमेच्या थेट प्रक्षेपणावर बंदी ?
By admin | Published: January 1, 2015 10:57 AM2015-01-01T10:57:52+5:302015-01-01T11:01:50+5:30
दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहीमेचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - दहशतवादी हल्ल्याच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहीमेचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. गृहमंत्रालयाने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून कॅबल टेलिव्हीजन नेटवर्क रुल्समध्ये दुरुस्ती करण्याची सुचना केली आहे.
२६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसारमाध्यमांनी सैन्याच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण दाखवले होते व याचा फायदा पाकमध्ये बसलेल्या सूत्रधारांना होत होता. थेट प्रक्षेपणामुळे मोहीमेतील गोपनीय माहिती उघड होते. तसेच सुरक्षा दलातील जवान, सामान्य नागरिक आणि पत्रकार यांच्या जीवालाही धोका असतो असे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. युपीए सरकारच्या काळातही लष्करी मोहीमांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्याचे प्रयत्न सुरु होते. तत्कालीन माहिती व प्रसारणमंत्र्यांनी यांसंदर्भात विधेयकही तयार केले होते. मात्र त्यावर अंतिम निर्णय झाला नव्हता. आता केंद्रातील मोदी सरकारने लष्करी मोहीमांचे थेट प्रक्षेपणावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे.