बलात्काराच्या घटनांचे उदात्तीकरण करणा-या मीडियाला बॅन करा - भाजपा नेत्याची मुक्ताफळे
By admin | Published: November 19, 2015 01:23 PM2015-11-19T13:23:07+5:302015-11-19T13:26:57+5:30
बलात्कारांच्या गुन्ह्यांचे वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्समधून ज्याप्रकारे वर्णन, उदात्तीकरण केले जाते, त्यासाठी मीडियावर बंदी आणली पाहिजे असे वक्तव्य भाजपा नेता ईश्वरअप्पा यांनी केले.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १९ - बलात्कारांच्या गुन्ह्यांचे वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्समधून ज्याप्रकारे वर्णन, उदात्तीकरण केले जाते, त्यासाठी मीडियावर बंदी आणली पाहिजे, अशी मुक्ताफळे भाजपाच्या कर्नाटकातल्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते के. एस. ईश्वरप्पा यांनी केले आहे. सतत वादग्रस्त वक्तव्ये करणा-या इश्वराप्पांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
कर्नाटकमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोलताना इश्वरअप्पा यांनी मीडियावरच टीकास्त्र सोडले. ' बलात्काराच्या घटनांचे वृत्तपत्रातील वृत्त मला वाचवतही नाही. टीव्ही चॅनेल्सचीही तीच स्थिती आहे. मीडिया ज्याप्रमाणे या गुन्ह्यांचे चित्रण करते, ते पाहून त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे' असे इश्वरअप्पा यांनी म्हटले.
यापूर्वीही इश्वरअप्पा यांनी बलात्काराच्या मुद्यावरून असंवेदनशील वक्तव्य केले होते. कर्नाटकात घडलेल्या लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांनंतर काँग्रेसवर टीका करणा-या इश्वरअप्पा यांना एका महिला पत्रकाराने विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करत आहात, असा सवाल विचारला असता, आत्ता तुमचं कुणी अपहरण केलं, नी तुमच्यावर बलात्कार केला तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करू शकतो ? असे असंवेदनशील वक्तव्य केलं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही काय करायला हवं हेदेखील इश्वरप्पांनी विचारलं आणि आम्हाला जे काही करणं शक्य आहे ते करत आहोत असंही ते म्हणाले