कांदा निर्यातीवर बंदी; दरवाढ राेखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:23 AM2023-12-09T07:23:48+5:302023-12-09T07:24:20+5:30

सरकारने २५ रुपये प्रतिकिलाे या दराने ऑक्टाेबरमध्ये बफर साठ्यातील कांदा विकण्याचा निर्णय घेतला हाेता

ban on onion exports; Central government's decision to maintain the rate hike | कांदा निर्यातीवर बंदी; दरवाढ राेखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

कांदा निर्यातीवर बंदी; दरवाढ राेखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : किमतीवर नियंत्रण ठेवणे व देशांतर्गत उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टिकाेनातून केंद्र सरकारने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने याची अधिसूचना जारी केली आहे.

सरकारने २५ रुपये प्रतिकिलाे या दराने ऑक्टाेबरमध्ये बफर साठ्यातील कांदा विकण्याचा निर्णय घेतला हाेता. २८ ऑक्टाेबर ते ३१ डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातीवर ८०० डाॅलर प्रतिटन एवढे निर्यात शुल्क आकरण्याचाही निर्णय घेतला. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये ४० टक्के निर्यात शुल्क लावले हाेते. काही देशांना त्यांनी विनंती केल्यास कांदा निर्यातीस परवानगी दिली जाऊ शकते. 

प्रमुख आयातदार कोण?
९.७५ लाख टन कांद्याची निर्यात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत झाली हाेती. बांगलादेश, मलेशिया आणि यूएई हे देश प्रमुख आयातदार हाेते.
६२.६०% महागाईचा वार्षिक दर कांद्याचा ऑक्टाेबरमध्ये हाेता.

सध्या एवढा आहे दर
राजधानीत किरकाेळ बाजारात सध्या ७० ते ८० रुपये किलाेने कांद्याची विक्री हाेते. देशातील अनेक भागांत कांद्याचा भाव ५० रुपये प्रतिकिलाेपेक्षा जास्त आहे.

Web Title: ban on onion exports; Central government's decision to maintain the rate hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा