कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवली; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:07 AM2020-12-29T02:07:43+5:302020-12-29T07:01:19+5:30

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

The ban on onion exports was finally lifted | कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवली; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवली; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली असून, या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होईल. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

 वाणिज्य मंत्रालयाच्या परदेश व्यापारी महासंचालकांनी याबाबतची अधिसूचना सोमवारी जारी केली. सर्व वाणांच्या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी १ जानेवारीपासून मागे घेण्यात येतं असल्याचा त्यात उल्लेख आहे. देशात कांद्याच्या किंमती कडाडल्याने सप्टेंबरमध्ये  सरकारने निर्यातीवर बंदी घटली होती. देशात कांद्याचे भाव खाली यावेत, स्थिर राहावेत, हा त्याचा उद्देश होता. आता पुरेसा कांदा बाजारात आला असून, त्याचे भावही खाली आहेत. त्यामुळे निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.
 

Web Title: The ban on onion exports was finally lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी