महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

By राजेश भोजेकर | Published: July 27, 2023 04:28 PM2023-07-27T16:28:50+5:302023-07-27T16:29:59+5:30

Online Games: गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली. 

Ban Online Games in Maharashtra, MLA Pratibha Dhanorkar Demands Govt | महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

महाराष्ट्रात ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला, आमदार प्रतिभा धानोरकर यांची सरकारला मागणी

googlenewsNext

चंद्रपूर - हल्ली मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. पण ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर तामिडनाडू राज्याच्या धर्तीवर बंदी घालण्याची लोकहितकारी मागणी औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात सरकारला केली. 

एकेकाळी केवळ टाईमपास असलेलं ऑनलाईन गेमिंग आता अनेकांचे व्यसन आहे. आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची 'साथ' आली आहे. 24 तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्यांचे व्यसन लागत आहे. सध्या राज्यात मोबाईल द्वारे अनेक ऑनलाईन गेम चा सुळसुळाट झाला आहे. या गेमद्वारे सर्रासपणे जुगार खेळाला जात असल्याचे निर्दशनास येत आहे. या जुगाराच्या विळख्यात तरुण पिढी तसेच लहान मुले सुध्दा गुंतलेली आहे. संपूर्ण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे.

या संपूर्ण ऑनलाईन गेम्स वर बंदी आणण्यासाठी यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न देखील उपस्थीत केला होता. अलीकडेच काही दिवसा आधी चंद्रपूर येथील देवाडा गावातील युवकाने ऑनलाईन रम्मी या खेळाच्या नादातून पत्नीची जीवन यात्रा संपून स्वतः आत्महत्या केली होती. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत व हजारो कुटुंबे उध्वस्त होत आहे.

तामिलनाडू सकारने अलीकडेच अध्यादेश काढून ऑनलाईन च्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे. बेटिंग आणि जुगारासह ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यासाठी हा अध्यादेश काढला. ज्याद्वारे जुगार आणि ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. तसा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढून युवा पिढीला यातून बाहेर काढावे त्याकरता महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावर बंदी घालण्याची मागणी सभागृहात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

Web Title: Ban Online Games in Maharashtra, MLA Pratibha Dhanorkar Demands Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.