'या' शहरात दारू आणि मांसाहाराच्या विक्रीवर बंदी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:31 PM2021-08-31T16:31:35+5:302021-08-31T16:31:54+5:30
Nonveg and Liquor Ban: 'दारू आणि मांस विकणाऱ्यांनी यापुढे दुध विकावं...'
मथुरा:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारू आणि मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुख्यमंत्री योगींनी संबंधित अधिकाऱ्यांना बंदीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. योगींनी सोमवारी संध्याकाळी मथुरेतील कृष्णोत्सव 2021 च्या कार्यक्रमात ही घोषणा केली.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 30, 2021
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्।। pic.twitter.com/wF4sTOZ1rj
'दारू आणि मांस विक्रेत्यांनी दूध विकावं'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच म्हटलं होतं की, धार्मिक महत्त्व असलेल्या शहरात मांस आणि दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल. यानुसार आता त्यांनी मथुरेत मांस आणि दारुच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तसेच, त्यांनी मथुरेच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दारू आणि मांसाच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना दुधाची विक्री सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.