एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पुढील वर्षी १ जुलैपासून बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:27 AM2021-08-14T06:27:45+5:302021-08-14T06:28:10+5:30

केंद्राचा निर्णय, कॅरिबॅग जाडीची मर्यादा वाढली

Ban on single use plastics from July 1 next year | एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पुढील वर्षी १ जुलैपासून बंदी

एकेरी वापराच्या प्लास्टिकवर पुढील वर्षी १ जुलैपासून बंदी

googlenewsNext

नवी दिल्ली : एकेरी वापराच्या प्लास्टिकचे उत्पादन आणि विक्रीवर केंद्र सरकारने १ जुलै २०२२ पासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वापरा आणि फेका या प्रकारात मोडणारे स्ट्रॉ, प्लेट्स, कप, पॉलिथीन इत्यादी प्रकारच्या उत्पादनांवर बंदी येणार आहे.

केंद्रीय पर्यायवरण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यात एकेरी वापराच्या प्लॅस्टिक बंदीबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने  या उत्पादनांवरील बंदीसोबतच पॉल‍िथीन बॅगची जाडी वाढविण्याचाही निर्णय घेतला आहे. 

अंमलबजावणी अशी...
या निर्णयाची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार, पॉलिथीनची जाडी ५० मायक्रॉनवरुन १२० मायक्रॉनपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ३० सप्टेंबरपासून अंमलबावजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ७५ मायक्रॉन एवढी जाडी असलेल्या पॉलिथीन बॅगवर बंदी लागू होणार आहे.
३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या बॅग्सवर बंदी घालण्यात येईल.
 

Web Title: Ban on single use plastics from July 1 next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.