तोगडियांच्या भाषण प्रसारणावर बंदी
By admin | Published: February 9, 2015 12:24 AM2015-02-09T00:24:56+5:302015-02-09T00:24:56+5:30
विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या भाषणाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण व प्रसारण करण्यावर बंगळुरू पोलिसांनी बंदी घातली आहे.
बंगळुरू : विहिंपचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या भाषणाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण व प्रसारण करण्यावर बंगळुरू पोलिसांनी बंदी घातली आहे.
उद्या सोमवारी ‘हिंदू विराट समावेश’ संमेलनामध्ये तोगडिया यांचे भाषण होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची आपली योजना विहिंपने जाहीर केल्यानंतर तासाभरातच पोलिसांनी तोगडियांच्या भाषणाच्या प्रक्षेपणावर बंदी घालणारा आदेश जारी केला. या संमेलनाला रविवारी सुरुवात झाली.
संमेलन स्थळावरून दोन्ही दिवसपर्यंत तोगडिया यांचे भाषण दृक्-श्राव्य अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त रेड्डी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट प्रक्षेपण करण्याची विहिंपची योजना असल्याची माहिती गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे. थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी दिली, तर तोगडियांविरुद्ध लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेश निष्फळ ठरेल. (वृत्तसंस्था)