केळी, कापूस प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ शक्य

By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:16+5:302016-01-02T08:33:16+5:30

जळगाव- नवीन वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये कापूस व केळी प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने त्यासंबंधीच्या घोषणा केल्या आहेत. त्यास मान्यता मिळाल्यास विविध प्रकल्पांचे स्वप्न साकार होऊ शकते.

Banana, cotton processing industries can be made possible | केळी, कापूस प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ शक्य

केळी, कापूस प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ शक्य

Next
गाव- नवीन वर्षात म्हणजेच २०१६ मध्ये कापूस व केळी प्रक्रिया उद्योगांची मुहूर्तमेढ होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने त्यासंबंधीच्या घोषणा केल्या आहेत. त्यास मान्यता मिळाल्यास विविध प्रकल्पांचे स्वप्न साकार होऊ शकते.
केळीपासून धागा व वाईन
पिंपरूड येथे ताप्ती व्हॅली सहकारी संस्थेत राज्य व केंद्र सरकारच्या पाठिंब्याने केळीपासून वाईन निर्मिती व धागा निर्मितीचे प्रयत्नांना फळाला येऊ शकतात. तसेच हिंगोणा ता.यावल येथे केळी महामंडळांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेऊन प्रक्रिया उद्योग रावेर, यावल व मुक्ताईनगरात उभे राहू शकतील.
शासनाची टिश्यू रोपे
शहरानजीक असलेल्या निमखेडी शिवारातील केळी संशोधन केंद्रामध्ये शासनातर्फे अनुदानावर वितरणासाठी टिश्यू केळी रोपांची निर्मिती होण्यास याच वर्षात सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्याबाबत शासनाने घोषणा केल्या आहेत.

कृत्रीम रेतन केंद्र
देशी गायींचा प्रसार, विकास यासाठी शहरात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत जेके संस्थेतर्फे कृत्रीम रेतन व पशु संशोधन केंद्राची स्थापना होऊ शकते. केंद्रीय कृषि मंत्रालय व राज्याचा दुग्धविकास विभाग यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभा करण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत.

कृषि विद्यापीठ
खान्देशात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विभाजन करून कृषि विद्यापीठस उभारणीसंबंधी राज्याच्या कृषि मंत्रालयाने कार्यवाही हाती घेतली आहे. त्यासंबंधी समिती काम करीत असून, हे विद्यापीठ जळगाव जिल्‘ाच्या पूर्व भागात स्थापन होऊ शकते.

पशुसंवर्धन व मत्स्य महाविद्यालय
पाचोरा किंवा चाळीसगाव येथे राज्य शासनाच्या अखत्यारितील पशुसंवर्धन व मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबतही घोषणा झाली आहे. त्यावर गतीने काम झाले तर हे महाविद्यालय याच वर्षात कार्यरत होऊ शकते.

टेक्सटाईल पार्क
जिल्ह्यात टेक्सटाईल पार्क स्थापनेसंबंधी जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी भुसावळ, चोपडा, चाळीसगावचे प्रस्ताव आले होते. आता जामनेरात हे पार्क स्थापन करण्यासंबंधी शासनाने घोषणा केली आहे.

Web Title: Banana, cotton processing industries can be made possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.