लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव, नियम मोडल्यास होणार दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 01:28 PM2019-08-28T13:28:03+5:302019-08-28T13:28:18+5:30
लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
लखनऊः लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केळीच्या सालींमुळे स्टेशन परिसर अस्वच्छ होत असल्यानं चारबाग रेल्वे स्टेशनवर फळ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनानं यासंदर्भात इशाराही दिला आहे. तसेच हा नियम मोडल्यास दंडासह कडक कारवाई करण्यात येणार आहे. विक्रेते आणि प्रवास या निर्णयानं फार आनंदी नाहीत.
चारबाग स्टेशनवरच्या एका फळ विक्रेत्यानं सांगितलं की, मी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून केळ्याची विक्री केलेली नाही. प्रशासनानं याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. इतर फळं महाग असल्यानं पहिल्यांदा गरीब लोक केळी खरेदी करत होते. लखनऊ आणि कानपूरदरम्यान दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्या अरविंद नागर म्हणाले, केळी सर्वात स्वस्त आहे. स्वास्थ्यवर्धक आणि सुरक्षित फळ आहे. ज्याचा उपयोग काही प्रवासी प्रवासादरम्यान करतात.
केळ्यानं परिसर अस्वच्छ होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. हे खरं असल्यास स्टेशनवरील शौचालयांवरही प्रतिबंध लादले गेले पाहिजेत. कारण सर्वात जास्त अस्वच्छता तिकडे असते. पाण्याची बोटल आणि पॅकिंग केलेले स्नॅक्सवरही प्रतिबंध लावले गेले पाहिजेत. केळ्यांच्या सालींपासून जैविक खत तयार करतात, तसेच त्या पर्यावरणाला हानिकारक नसल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.