नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या सातव्या दिवशी वधू बॉयफ्रेंडसोबत दागिने घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 10:25 AM2023-06-17T10:25:34+5:302023-06-17T10:27:05+5:30

मुलीचं लग्न झालं होतं, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता.

banda bride returned to her maternal home on seventh day of marriage absconding with her boyfriend | नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या सातव्या दिवशी वधू बॉयफ्रेंडसोबत दागिने घेऊन पसार

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नाच्या सातव्या दिवशी वधू बॉयफ्रेंडसोबत दागिने घेऊन पसार

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बांदा येथे नववधू लग्नानंतर प्रियकरासह पळून गेल्याची घटना समोर आली आहे. 31 मे रोजी मुलीचं लग्न झालं होतं, त्यानंतर ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या माहेरी आली होती. पण तिचा काही वेगळाच प्लॅन होता. घरच्यांना काही सामान घ्यायचं आहे असं सांगून ती बाजारात जायला निघाली आणि त्यानंतर तरूणी तिथून प्रियकरासह पळून गेली. यासोबतच तिने घरातून दागिने आणि रोख रक्कमही नेली आहे. 

मुलगी घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी मुलीला फोन केला पण स्वीच ऑफ येत होता. त्यानंतर नातेवाईकांसह वडिलांनी तिचा शोध सुरू केला. परंतु नववधूबाबत काहीही कळू शकलं नाही. नंतर कळलं की मुलगी एका नातेवाईकासोबत पळून गेली आहे. व्यथित झालेल्या वडिलांनी दोन तरुणांची नावे घेऊन एफआयआर दाखल केला आहे. आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचं वडिलांचं म्हणणं आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.

हे प्रकरण नरैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी 31 मे 2023 रोजी कालिंजर पोलीस स्टेशन परिसरात आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. सहा जून रोजी मुलगी माहेरी परतली. त्यानंतर 11 जून रोजी ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने बाजारात गेली आणि परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे वडिलांना समजले. यासोबतच घरातून रोख रक्कम आणि दागिनेही नेले आहेत. 

मुलीचा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून मुलीच्या भावाच्या सासरकडील नातेवाईक आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस नवविवाहित महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी माहिती देताना एसएचओ नरैनी अरविंद सिंह गौर यांनी सांगितले की, मुलीच्या बेपत्ता प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. सध्या तिचा शोध सुरू आहे. लवकरच मुलीचा शोध घेऊन पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: banda bride returned to her maternal home on seventh day of marriage absconding with her boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न