बेंगळुरुत बॉम्बस्फोट, एक महिला ठार, एक जखमी
By admin | Published: December 29, 2014 12:31 AM2014-12-29T00:31:57+5:302014-12-31T10:02:54+5:30
बेंगळुरुयेथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक महिला ठार आणि एक जण जखमी झाला.
बेंगळुरु : बेंगळुरुयेथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक महिला ठार आणि एक जण जखमी झाला. ठार झालेल्या महिलेचे नाव भवानी असून ती तामिळनाडूची राहणारी आहे. जखमी इसमाचे नाव कार्तिक आहे आणि त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
बेंगळुरुतील चर्च स्ट्रीट या वर्दळीच्या भागात असलेल्या कोकोनट ग्रोव्ह नावाच्या उपहारगृहाबाहेर रात्री ८.३० वाजता हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे भवानीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बॉम्ब स्फोटानंतर बॉम्बचे तुकडे या महिलेच्या डोक्यात घुसल्याचीा माहिती पोलिसांनी दिली. स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांना फोन केला आणि सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)