बंगळुरूत मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचे झाले हाल
By admin | Published: July 7, 2017 04:09 PM2017-07-07T16:09:49+5:302017-07-07T16:10:28+5:30
बंगळुरूमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचे शुक्रवारी सकाळी चांगलेच हाल झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7- बंगळुरूमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचे शुक्रवारी सकाळी चांगलेच हाल झाले. तेथिल मेट्रो कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बंगळुरू मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी मेट्रो सेवा बंद करून शुक्रवारी सकाळपासून निदर्शनं केली. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नियोजीत ठिकाणी पोहचायला समस्यांचा सामना करावा लागला. मेट्रोने प्रवास करणाऱ्या चार लाख प्रवाशांना या निषेधाचा फटका बसला. ज्या प्रवाशांना मेट्रो बंदीबद्दल माहिती मिळाली त्यांनी खाजगी गाड्यांचा वापर करून प्रवास केला.
बंगळुरू मेट्रोचे कर्मचारी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. तसंच त्यांची सुटका होइपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला. दररोज सकाळी पाच वाजता बायपनहळ्ळी, नागसारडा, मयूर रोड आणि येलचेनहळ्ळी या मार्गावरून मेट्रोच्या गाड्या सुरू होतात. पण आज मात्र कर्मचाऱ्यांनी मेट्रो रेल्वे स्थानकावरचं शटर बंद केले आहे. नम्मा मेट्रोचं जाळं शहरात सुमारे ४२ किमी पसरलेले आहे. या मेट्रोवर सुमारे चार लाख प्रवासी अवलंबून आहेत.
सकाळी आठ वाजता मी महालक्ष्मी मेट्रो स्टेशनवर पोहचलो तेव्हा मेट्रो बंद असल्याची माहिती मला मिळाली होती. म्हणूनच ऑफिसला मी कॅबने गेलो, अशी माहिती एका प्रवाशाने दिली आहे. हजारो लोकांना मेट्रो सर्व्हिस बंद असण्याचा फटका बसल्याचं त्या प्रवाशाने सांगितलं.
आणखी वाचा
कर्जमाफी योजना फसवी - अजित पवार
चीनच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का ? राहुल गांधींचा मोदींना सवाल
गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती
"मेट्रो कर्मचारी आणि कर्नाटक स्टेट इंडस्ट्रीअल सिक्युरिटी पर्सोनेल यांच्यात गुरुवारी बाचाबाची झाली. यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांपैकी काहींना अटक झाली होती. म्हणूनच कर्मचारी आपल्या या सहकाऱ्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. यातून तोडगा काढण्चाचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणातील पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना तसंच मेट्रो कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केल्याची माहिती, अतिरिक्त पोलीस आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी दिली आहे. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही सविस्तर माहिती दिली आहे.