बांगला देशचा विजय

By admin | Published: February 18, 2015 11:53 PM2015-02-18T23:53:55+5:302015-02-18T23:53:55+5:30

बांगला देश १०५ धावांनी विजयी

Bangla Country's Victory | बांगला देशचा विजय

बांगला देशचा विजय

Next
ंगला देश १०५ धावांनी विजयी
अफगाणिस्तानला अनुभव नडला : शाकिब, मुशफिकरची अर्धशतके
कॅनबेरा : शाकिब अल हसन आणि मुशफिकर रहीम यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगला देशने विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानला बुधवारी १०५ धावांनी पराभूत केले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या बांगला संघाने २६७ धावा ठोकल्या. एकवेळ त्यांचीही ४ बाद ११९ अशी दयनीय अवस्था होती. पण शाकिब ६३ आणि मुशफिकर ७१ यांनी पाचव्या गड्यासाठी ११४ धावा ठोकून संघाला तारले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ ४२.५ षटकांत १६२ धावांत बाद झाला. समीउल्लाह शेनवारी ४२ व कर्णधार मोहम्मद नबी ४४ हेच बांगला देशच्या माऱ्याला समर्थपणे तोंड देऊ शकले. बांगला देशसाठी मूशर्रफ मूर्तझाने तीन आणि शाकिबने दोन गडी बाद केले.
बांगला देशच्या आणखी धावा झाल्या असत्या पण शाकिब आणि रहीम बाद होताच अखेरचे पाच गडी केवळ ३४ धावांची भर घालून बाद झाले. त्याआधी मीरवाईज अश्रफने बांगला देशला बॅकफुटवर आणले. त्याने इनामूल हक २९ आणि तमिम इक्बाल १९ यांना झटपट बाद केले. सौम्या सरकार २८, महमदुल्लाह २३, यांना शापूर जरदान याने बाद केले. नंतर शाकिबने २७ वे अर्धशतक नोंदविले शिवाय चार हजार धावा करणारा बांगला देशचा पहिला खेळाडू बनला. रहीमने ५६ चेंडूंवर सहा चौैकार व एका षटकारासह १९ वे वन डे अर्धशतक गाठले.
अफगाणिस्तानला पुरेसा अनुभव नसल्याने तीन धावांत त्यांचे तीन गडी तंबूत परतले. नवरोज मंगल २७ आणि शेनवारी ४२ यांनी मोठी भागीदारी केली. बांगला देशला २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तसेच अफगाणिस्तानला २२ ला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.(वृत्तसंस्था)
...........................................................

Web Title: Bangla Country's Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.