"हिंदू अल्पसंख्यांकांना जीव गमवावा लागतोय अन् UN शांत आहे, हे दुर्देवी;" ISKON कडून नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:17 PM2022-03-18T16:17:45+5:302022-03-18T16:19:07+5:30
ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला. जमावानं केली तोडफोड. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
होळीच्या (Holi) एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची (Bangladesh Capital) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २०० लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच, याठिकाणी लूटही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या घटनेचा इस्कॉन इंडियाकडून निषेध करण्यात आला आहे. इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेचा निषेध करत ते दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे.
"डोल यात्रा आणि होळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी १५ मार्च हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. हजारो असहाय्य बांगलादेशी आणि पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या दु:खाबद्दल तेच संयुक्त राष्ट्र मूक भूमिका घेत आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटतं," असं राधारमण दास म्हणाले.
It's very very unfortunate incident on the eve of Dol Yatra & Holi celebrations. Just few days ago, United Nations passed a resolution declaring 15th March as International day to combat Islamophobia. We are surprised that same United Nations.....1/3 https://t.co/aMci2GdQdv
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) March 18, 2022
तर दुसरीकडे राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील परराष्ट्र मंत्रालयानं हा मुद्दा बांगलादेशकडे कठोरपणे उचलण्याची मागणी केली आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आणि प्रार्थनास्थळांप्रती ही वाढती असहिष्णुता लज्जास्पद असल्याचं त्या म्हणाल्या.
Requesting @MEAIndia to take this up strongly with Bangladesh. This growing intolerance towards Hindu minority and places of worship is shameful. https://t.co/kzfVO5YFIQ— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) March 18, 2022
इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. या ठिकाणी असलेले साहित्यदेखील जमावाकडून लुटण्यात आलं.