बांग्लादेशने हिंदूंवरील हल्ले तात्काळ थांबवावे; इमाम ऑर्गेनायझेशनचे प्रमुख इलियासी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 21:04 IST2024-12-06T21:02:48+5:302024-12-06T21:04:27+5:30
Bangladesh News : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत.

बांग्लादेशने हिंदूंवरील हल्ले तात्काळ थांबवावे; इमाम ऑर्गेनायझेशनचे प्रमुख इलियासी संतापले
Bangladesh News : बांग्लादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर सातत्याने तेथील हिंदूंवर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी या घटनांचा निषेध केला आहे. असे असतानाही अद्याप हल्लेखोरांवर ठोस कारवाई झालेली नाही. अशातच, ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांनीदेखील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे.
दिल्ली: बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचारों पर ऑल इंडिया इमाम ऑर्गेनाइजेशन के चीफ इमाम डॉ उमर अहमद इलियासी ने कहा "मैं इसकी निंदा करता हूं। भारत ने हमेशा उनका सहयोग किया है। आज जो हालात हैं उन्हें देखते हुए वहां शांति होनी चाहिए। जो अत्याचार हिंदुओं पर हो रहा है वह बंद… pic.twitter.com/PQGJ4F58mv
— IANS Hindi (@IANSKhabar) December 6, 2024
हिंदूंवरील हल्ले थांबवा
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ.ओमर अहमद इलियासी म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मी निषेध करतो. भारताने त्यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता, तिथे शांतता प्रस्तापित व्हावी. हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत. मी मोहम्मद युनूस यांना सांगू इच्छितो की, त्यांनी ताबडतोब गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी.
बांग्लादेश आर्मीने 'चिकन नेक' परिसरात तैनात केले किलर ड्रोन्स; भारत सरकार अलर्टवर
तिरंग्याचा अवमान तात्काळ थांबवावा
दरम्यान, पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा गौसिया समिती या मुस्लिम संघटनेने बांग्लादेशमध्ये भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याच्या घटना त्वरित थांबविण्याची मागणी केली होती. त्रिपुरा गौसिया समितीचे अध्यक्ष अब्दुल बारिक म्हणाले की, बांग्लादेशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अशांततेबद्दल आम्ही चिंतित आहोत. सनातन धर्म मानणाऱ्या लोकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांची मालमत्ता जाळली जात आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. बांग्लादेशात आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होताना पाहून खूप त्रास होतोय.
आता बांग्लादेशातील नोटाही बदलणार, नव्या डिझाइनवर काम सुरू! कारण काय?