बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न; हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 07:12 AM2024-08-09T07:12:50+5:302024-08-09T07:13:16+5:30

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले.

Bangladeshi infiltration attempt; Thousands of citizens gathered at the Bihar border, requesting asylum in India | बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न; हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती

बांगलादेशींचा घुसखोरीचा प्रयत्न; हजारो नागरिक जमले बिहार सीमेवर, भारतात आश्रय देण्याची केली विनंती

एस. पी. सिन्हा -

पाटणा/नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसक कारवाया तसेच राजकीय अस्थिरता यामुळे गांजलेले काही हजार लोक भारतालगतच्या सीमेवर जमा झाले होते. तिथून त्यांनी बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न गुरुवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हाणून पाडला. आम्हाला भारतात आश्रय द्या, अशी विनंती हे बांगलादेशी नागरिक करत आहेत.

हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. बांगलादेशच्या हद्दीत जमा झालेल्या हजारो नागरिकांशी संवाद साधून, त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्यात आले. 

बांगलादेशमधील जनतेच्या हिताला भारत देतो प्राधान्य
nबांगलादेशच्या जनतेच्या हिताला आम्ही प्राधान्य देतो. त्या देशात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे भारताने गुरुवारी सांगितले. 
nपरराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही माहिती दिली.

‘भारतात अस्थिरतेचा प्रयत्न सुरू’
बांगलादेशमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतात अस्थिरता व तेथील जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काही प्रवृत्तींचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताकुमारी यांनी  केला. राष्ट्रीय 
स्वयंसेवक संघ परिवारातील राष्ट्रसेविका समिती ही महिला संघटना आहे. 

‘कठीण प्रसंगात आईबरोबर असणे आवश्यक होते’
ढाका : बांगलादेशमधील घटनांमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे मी अतिशय दु:खी झाले, असे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या सायमा वाझेद यांनी गुरुवारी सांगितले. 
त्या म्हणाल्या की, अतिशय कठीण प्रसंगात मी माझ्या आईसोबत नाही याचे अतिशय वाईट वाटते. सायमा वाझेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या विभागीय संचालक आहेत. 

मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा
मुंबई : राज्यातील विद्यार्थी, अभियंत्यांना मायदेशात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे एस. जयशंकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारसोबत काम करणार : अमेरिका
न्यूयॉर्क : बांगलादेशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. त्यामुळे तिथे सत्तेवर येणाऱ्या मुहम्मद युनूस प्रमुख असलेल्या हंगामी सरकारबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले.

घटनांमागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना
ढाका : बांगलादेशमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसिना त्या देशात परत येतील असे त्यांचे पुत्र सजीब वाझेद जॉय यांनी गुरुवारी सांगितले. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयने केलेल्या कारवायांमुळे बांगलादेशात अशांतता निर्माण झाली, असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: Bangladeshi infiltration attempt; Thousands of citizens gathered at the Bihar border, requesting asylum in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.