लटकलेल्या अवस्थेत आढळला ट्रेनी कॅडेटचा मृतदेह; 6 एअरफोर्स अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 06:16 PM2022-09-25T18:16:55+5:302022-09-25T18:17:17+5:30

बंगळुरूत हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी कॅडेटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Banglore News | trainee cadet found hanging; FIR against six Air Force officers | लटकलेल्या अवस्थेत आढळला ट्रेनी कॅडेटचा मृतदेह; 6 एअरफोर्स अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप

लटकलेल्या अवस्थेत आढळला ट्रेनी कॅडेटचा मृतदेह; 6 एअरफोर्स अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप

Next

बंगळुरू: बंगळुरू येथे हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थी कॅडेटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय अंकित झा याचा मृतदेह एअर फोर्स टेक्निकल कॉलेज (AFTC) च्या एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. अंकितविरुद्ध 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी' सुरू होती, त्यावरून चार-पाच दिवसांपूर्वी अंकितचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अंकितचा भाऊ अमन झा याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी गंगामना गुडी पोलिस ठाण्यात हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी पहाटे साडेचार वाजता एएफटीसीचे जवान पुराव्यासह पोलीस ठाण्यात हजर असल्याने पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप अमनने आपल्या तक्रारीत केला आहे.

तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, अंकितच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे. अंकित झा हा प्रशिक्षणार्थी कॅडेट होता आणि तो एएफटीसीच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलीस अधिकारी म्हणाले की, "ज्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली नाही. परंतु हवाई दलाने आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे." 

Web Title: Banglore News | trainee cadet found hanging; FIR against six Air Force officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.